येवला, प्रतिनिधी
येथील कुणाल दराडे फाउंडेशन, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि येथील नवचैतन्य क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार व कुमारी गट जिल्हा (ग्रामीण) अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा अतिशय रंगतदारपणे पार पडली. चुरशीच्या व उत्तमता वाढवणाऱ्या या स्पर्धेचे मुलांच्या गटाचे विजेतेपद मनमाड येथील उदय क्रीडा मंडळाने तर मुलींच्या गटातील विजेतेपद निफाड येथील सरस्वती संघाने पटकावले.
येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर या स्पर्धा दोन दिवस प्रकाशझोतात मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन आमदार नरेंद्र दराडे यांच्या उपस्थितीत झाले.याप्रसंगी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे उपप्राचार्य प्रा.शिवाजी गायकवाड,जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक
दादासाहेब मामुडे,प्रजापती ब्रह्मकुमारी नीता दीदी तसेच कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कुणाल दराडे हे देखील उपस्थित होते.जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा असल्याने या स्पर्धेत निफाड,मालेगाव, चांदवड,बागलाण,येवला येथील २६ संघानी कुमार गटात सहभाग घेतला असल्याने अनेक नामांकित व उत्कृष्ट खेळाडूंच्या नेत्रदीपक खेळाने प्रेक्षकांना दर्जेदार सामन्यांचा आस्वाद घेता आला.सदर स्पर्धा या सर्व आंतरराष्ट्रीय कबड्डी नियमाप्रमाणे खेळण्यात आल्या.त्यात प्रामुख्याने सुपर टॅकल,डू ऑर डाय रेड या सर्व गोष्टी असल्यामुळे सर्वसामन्यात रंगत निर्माण होत राहिली व कधी सामना या बाजूने तर कधी सामना त्या बाजूने असा झुकत राहिला..मुलांचे साखळी पद्धतीने ३० सामने खेळण्यात आले त्यानंतर बादफेरीचे १५ असे एकूण ४५ सामने घेण्यात आले. यामुळे येथील कबड्डी शौकिनांना अनेक रंगतदार सामन्यांचा आनंद लुटता आला.
कुमार गटाचा अंतिम सामना उदय क्रीडा मंडळ मनमाड आणि जय बजरंग मंडळ शिंगवे या संघात झाला.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती व सामन्याचे पारडे दोन्ही बाजूला झुकत होते.शेवटी उदय क्रीडा मंडळाने विजय मिळवला व करंडाकावर आपले नाव कोरले.कुमार गटात उदय मंडळाचा खेळाडू अमित कातकडे यास उत्कृष्ट पकडीसाठी तर जय बजरंग शिंगवे संघाचा सिद्धेश वनवे या खेळाडूस उत्कृष्ट चढाई पटू म्हणून गौरवण्यात आले.
कुमारी विभागात मुलींच्या एकूण १० संघानी सहभाग नोंदविला.साखळीतील आठ व बाद फेरीतील सात असे एकूण १५ सामने खेळवण्यात आले.कुमारी गटाचा अंतिम सामना सरस्वती स्पोर्ट्स क्लब निफाड आणि के.डी. के. एस. ज्युनिअर कॉलेज अनकाई (ता.येवला) या संघात झाला.या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लब विजयीश्री मिळवली.कुमारी विभागात आरती घोटेकर (सरस्वती क्लब) उत्कृष्ट पकड तर स्नेहल परदेशी (के.डी. के. एस.अनकाई) उत्कृष्ट चढाई पट्टू म्हणून गौरवण्यात आले.
स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कैलाश भांगरे यांनी निरीक्षक म्हणून तर विलास मोरे यांनी पंचप्रमुख व राजेश निकम यांनी सहाय्यक पंच प्रमुख म्हणून स्पर्धेसाठी भूमिका पार पाडली.तसेच स्पर्धा निकोप पार पाडण्यासाठी नाशिक,मनमाड येथून आलेल्या ३२ पंचांनी अथक परिश्रम घेतले.या स्पर्धेत कुमार गटासाठी रवी खैरे,महेंद्र वाघ,रामेश्वर सानप यांनी निवड समिती सदस्य म्हणून भूमिका पार पाडली तर कुमारी गटासाठी योगेश मंडलिक,रमेश केदारे आणि चांगदेव खैरे यांनी निवड समिती सदस्य म्हणून कामकाज पाहिले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नवचैतन्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष नांदुर्डीकर,विकासनाना गायकवाड,संजय पवार,शांताराम गायकवाड, नंदकिशोर गायकवाड,चांगदेव खैरे,नितीन ढमके,दिनेश आव्हाड,कल्पेश पटेल,सुनील शिंदे,हेमंत धांडे,राजेंद्र शिंदे,जयवंत खांबेकर,
सुहास भांबारे,परेश मिसाळ,किरण गुळवे, शिवाजी साताळकर,अंबादास जाधव,विजय गोसावी,मकरंद तक्ते,अनिल जाधव,संतोष माळी,प्रशांत शिंदे,तुषार सोमवंशी,अरुण गायकवाड,विजय गोसावी,प्रसाद निकम,हनिफ तांबोळी,सादिक अन्सारी,बंडू शेलार,संतोष जाधव,किरण नारखेडे,राकेश भांबारे,प्रकाश भगत,शशी मोरे, इम्तियाज बेग,सुमित गायकवाड,मंदार खैरे, हरीश बनसोडे,वैभव गायकवाड,सूर्यकांत गायकवाड आदीनी अथक परिश्रम घेतले. स्वप्नील बाकळे यांनी सूत्रसंचालन केले तर किरण कुलकर्णी यांनी आभार मानले.