उरण मधील विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यां समवेत साजरी झाली दिवाळी

0

उरण दि १०(विठ्ठल ममताबादे ) : श्रीमंत व मध्यमवर्गीय आपापल्या परीने  आपल्या मुलांसमवेत दिवाळी आनंदात साजरी करत असतात, मात्र दुर्गम भागात राहात असणाऱ्या आदिवासी बांधवांच्या मुलांना दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने उरण तालुक्यातील वी क्लब ऑफ द्रोणागिरी ,स्व.तृप्ती सुधीर सुर्वे फाऊंडेशन उरण व माई फॉउंडेशन उरण Uran यांच्या संयुक्त विद्यमाने पुनाडे आदिवासी वाडीतील सर्व मुलांना फराळ ,फटाके व चाॅकलेट वाटप करण्यात आले.

या वेळी स्व.तृप्ती सुधीर सुर्वे फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा कल्पना सुर्वे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून करत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती देवून भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमास हातभार लावून या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल अशी भावना व्यक्त केली.

   या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे चे संस्थापक अध्यक्ष  राज्य आदर्श  शिक्षक पुरस्कार विजेते मनोज पाटील,वी क्लब ऑफ द्रोणागिरी च्या अध्यक्षा ,माई फॉउंडेशनच्या अध्यक्षा श्लोक पाटील ,कल्पना सुर्वे ,आरती ढोले,गायत्री माळी ,सोनाली वर्मा ,नम्रता पाटील,सृष्टी शिंदे ,पुनाडे वाडीचे प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद नवाळे,विशाल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here