वीर वाजेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी साजरी केली कोप्रोली आदिवासी वाडीवर

0

उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )

रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय फुंडे या महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने  प्राथमिक शाळा कोप्रोली आदिवासी वाडी या ठिकाणी दिवाळी निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वाडीतील कुटुंबियांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला भारतीय सणामध्ये दिवाळी या सणाला आगळे -वेगळे असे महत्व आहे.हा दिवाळी सण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आदिवासी बांधव व वाडीवरील विद्यार्थ्यांसमवेत साजरा केला.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी जी पवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कार्यक्रमास वाडीवर प्रा. भूषण ठाकूर, प्रा योगेश कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक  गणेश म्हात्रे , शिक्षक   गुरुनाथ कोळी, अंगणवाडी सेविका वनिता म्हात्रे , कोप्रोली ग्रामपंचायत सदस्या बेबीताई कातकरी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रा. बळीराम पवार, ग्रंथपाल सुप्रिया नवले,प्रा. दिव्या ठाकूर यांचे महत्वाचे सहकार्य लाभले.ह्या सामाजिक कार्यक्रमास वाणिज्य वर्गातील विद्यार्थी प्रतिनिधी अग्निशा कडू, पुजा मुढे तसेच विद्यार्थी साहिल पाटील, प्रियांशु पाटील, जिज्ञेश सणस व बॉबी माळी व विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे  सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन वाणिज्य विभागप्रमुख प्रा. प्रांजल भोईर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here