प्रशासनाची पळापळ !
कोण देतोय ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्याला मानसिक त्रास?
दक्षिणा न मिळाल्याने अखेर त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल?
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी राजेंद्र उंडे
सध्या जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब आघाव व सुनील मोरे या पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्यांची घटना संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना पुन्हा राहुरी पोलिस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांने आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
नुकतेच आठवडा भरापूर्वी राहुरी पोलीस स्टेशनच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने लाच मागितल्याची रेकॉर्डिंग नाशिक विभागाचे लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांकडे गेली होती. तर हा प्रकार लाच मागितल्याचा नसून उसनवारी पशाचा असल्याचेबोलले जात असुन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने या कारवाईला वैतागून दिनांक १७ ऑक्टोबर रोजी नगर काल कंट्रोलला फोन करून मी आता करत आत्महत्या असल्याचे सांगून चक्क मोबाईल बंद केल्याने नगरसह राहुरी पोलीस स्टेशनची काही काळ चांगलीच पळापळ झाली असल्याची चर्चा सध्या होत आहे.
संबंधित नगर जिल्ह्यातील पोलिसांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याचा तपास त्याचे लोकेशन मुंबई येथील परिसरात लागल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या मुंबईच्या त्या पोलीसाच्या नातेवाईकांना पाचारण करून त्या कर्मचाऱ्यास आत्महत्या करण्यापासून रोखल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईक व पोलीस प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे. गेली आठवडा भरापूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याने अदखलपात्र गुन्ह्यात एका तरुणाला २० हजार रुपयांची लाच मागितल्याची रेकॉर्डिंग नाशिक विभागाच्या लाचलुचपत पथकाकडे गेल्याने ? या पथकाने त्या राहुरीतील पोलीस कर्मचाऱ्यावर सापळा लावला होता मात्र तो यशस्वी झाला नाही व तो कर्मचारी लाच स्वीकारतांना पकडला गेला नाही मात्र लाचलुतपत विभागाकडे कर्मचाऱ्याची रेकॉर्डिंग केल्याने संबंधित विभागाने त्या पोलीस कर्मचाऱ्यावर निव्वळ रेकॉर्डिंग च्या आधारे गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अचानक त्या फिर्यादीने पोलिस माझा नातेवाईक आहे. मी सहज हा उद्योग केला ? असे म्हणून मला तक्रार द्यायची नाही असे म्हणत घुमजाव करत अशी भुमिका घेतल्याने लाच लुचपतचे अधिकारी स्वतःहाच तक्रार देण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात होते.शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरचा प्रकार हा गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून सुरू होता यामध्ये अनेक वजनदार गठोड्याची मागणी झाल्याची चर्चा आहे.माञ त्या फिसकटल्याने गुन्हा दाखल होण्यासाठी पथकाच्या हालचाली सुरू आहेत.
नुकतीच राहुरी पोलिस ठाण्यातील एक घटना समोर आली आहे रेकॉर्डिंग करून त्या पोलीस कर्मचाऱ्याला गुंतवणारा तो फिर्यादी चक्क त्याचा नातलग असल्याने हा प्रकार उसनवारी पैशाचा असल्याचे समोर आले आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याने मुंबई येथून नगर कंट्रोलला फोन करून माझ्यावर आपल्याच काही पोलिसांनी अन्याय केला आहे? आता मी मंत्रालया समोर आत्महत्या करत असल्याचे सांगून चक्क मोबाईल बंद केला. हे प्रकरण कंट्रोल ने सर्वत्र पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्याने राहुरी पोलीस प्रशासना सह नगर व नाशिक पोलीस अधिकारी व लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यामध्ये खळबळ उडाली होती.
.…..ती नावे उघड होतील ?
प्रकरण मिटविण्यासाठी ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यावर दबाव टाकला जात आहे. तर या पोलिस कर्मचाऱ्याने जर आत्महत्या केली तर लाचलुचपत विभाग? यासह कोण कोणत्या खाकीवाल्याने व त्या पथकातील वजन ठेवण्यासाठी त्रास दिला? त्यांची नावे उघड होईल होऊ शकते. मात्र पुढे काय… काय घडामोडी होणार आहे.