भाऊबीज सणगोड bhaubeej
आनंदा भरते आले
भरभरुन स्नेह मिळे
डोळे नकळत ओले…
सण भावाबहीणीचा
घरटे सगळे सजले
दिवाळीत ये बरसात
कुटुंबअख्खे भिजले…
प्रकाश फाके अंतरी
डोळे निरांजन झाले
ओवाळून घेतलेअन्
मन ओसंडून न्हाले…
ओवाळणी भाऊ देई
पाकीट रिकामे झाले
हृदय भरभरुनि वाहे
रे मन वा-यावर झुले…
लक्ष पाकीटेभरलेली
टाकू ओवाळून भले
बहीणीच्या प्रेमा पुढे
हजार खजिने खुले…
पावित्र्य ये सणांमध्ये
जगाचे होई चांगभले
धन्यदेवा दिल्यास तू
असंख्य बहिणी मले…
– हेमंत मुसरीफ , पुणे.
9730306996