कोपरगांव (वार्ताहर)
दिवाळी सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने ‘ आनंदाचा शिधा ‘ वाटप करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून गोरगरीब जनतेच्या घरातील अंधार दूर करणारा आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात केले.
दिवाळी सण आनंदात साजरा करता यावा या उद्देशाने शिंदे – फडणवीस सरकारने गोरगरीब जनतेसाठी शंभर रुपयात रवा, साखर, हरबरा दाळ आणि गोडेतेल या वस्तू ‘आनंदाचा शिधा ‘ म्हणून देण्याची घोषणा केली होती. संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानामार्फत हा शिधा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील, सरपंच सौ. सुलोचनाताई ढेपले यांच्याहस्ते संवत्सर परिसरातील लाभार्थ्यांना नुकताच वितरीत करण्यात आला. याप्रसंगी श्री राजेश परजणे पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक व स्वागत केले.
सद्याच्या महागाईच्या काळात गोरगरीब जनतेला रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. ही जाणीव ठेवून शिंदे – फडणवीस सरकारने चार वस्तू अवघ्या शंभर रुपयामध्ये देवून दिवाळी गोड केलेली आहे. सर्वसामान्य जनतेला यातून मोठा आधार मिळालेला आहे. ‘आनंदाचा शिधा ‘ हातात पडल्यावर गोरगरीबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करुन सरकरला धन्यवाद दिलेत. संवत्सर परिसर हा तालुक्यात सर्वात मोठा परिसर असून सर्व लाभार्थ्यांना शिधा वाटप करण्यात येईल असे श्री परजणे पाटील यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे, चंद्रकांत लोखंडे, लक्ष्मणराव परजणे, दिलीपराव ढेपले, सोमनाथ निरगुडे, रघुनाथ भोकरे, दिनकर परजणे, कृष्णा आबक, अविनाश गायकवाड, बापू तिरमखे, विजय आगवन, बापू गायकवाड, बाळासाहेब दहे, अनिल आचारी, बाळासाहेब गायकवाड, हबीब तांबोळी, अर्जुन तांबे, मोहन ढेपले यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.