उरण महाविद्यालयात एड्स दिनानिमित्त आरोग्य तपासणी.

0

उरण दि १(विठ्ठल ममताबादे )

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त आयुष्यमान भव कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम एन. गायकवाड यांनी याप्रसंगी कोविड -१९ नंतर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक झाले असून त्यासाठी वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. बाबासो कालेल( वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय उरण) यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३० महाविद्यालयीन कर्मचारी व १२५ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आरोग्याची तपासणी यावेळी केली.

लिपिड प्रोफाइल टेस्ट करून सर्वांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निरसन डॉक्टरांनी केले. एड्स दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात एड्स जनजागृती पोस्टर्स प्रदर्शन आयोजित केले गेल. महादेव पवार( समुपदेशक ग्रामीण रुग्णालय) यांनी एचआयव्ही जनजागृती विषयी विद्यार्थ्यांना संबोधित केले. कुमारी तृप्ती परजणे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) डॉ. स्वाती म्हात्रे( वैद्यकीय अधिकारी) डॉ. स्नेहल कोळी (वैद्यकीय अधिकारी) श्रीमती हिरा वीर, संजीवनी म्हात्रे, संगीता शिंदे (अधिपरिचारिका) यांनी आरोग्य तपासणीचे कार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आय क्यु ए सी समन्वयक डॉ. ए.आर.चव्हाण, राष्ट्रीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी  डॉ. दत्ता हिंगमिरे, ऑफिस सुप्रीटेंडंट तानाजी घ्यार,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here