न्यू मंगलोर पोर्ट चे चेअरमन डॉ.ए.व्ही.रमन्ना सोबत भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाची चर्चा.

0

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )

भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, कामगार नेते सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली न्यू मंगलोर पोर्ट चे चेअरमन डॉ.ए.व्ही. रमन्ना यांच्यासोबत लोकल कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली. या कामगारांच्या प्रश्ना वरील चर्चेत येथील कामगारांचे असलेले स्थानिक प्रश्न तसेच कामगारांच्या अडीअडचणी बाबतीत सुरेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी भक्कम बाजू मांडली, या चर्चेत कामगारांच्या प्रश्नाबाबत चांगले सहकार्य करण्याचे डॉ.ए. व्हीं. रमन्ना यांनी मान्य केले व लोकल कामगारांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात कामगार नेते आणि केंद्रीय पदाधिकारी अण्णा धुमाळ, विघ्नेश नाईक, रमेश भंडारी,भरत कुमार, मधुकर पाटील ,अनिल चिर्लेकर,जनार्दन बंडा, आणि स्थानिक कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here