समाजऋणलणातून उतराई होण्यासाठी योगदान महत्वाचे : प्रा.रामकली पावसकर

0

सातारा /अनिल वीर : समाजातील प्रत्येक घटकांनी प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्यास फुल नाही फुलांची पाकळी म्हणून मदत करणे आज काळाची गरज आहे.असे प्रतिपादन ज्येष्ट कवयित्री प्रा.रामकली पावसकर यांनी केले.

    येथील नगर वाचनालयाच्या पाठक सभागृहात संबोधी प्रतिष्ठानला रु.२५ हजाराचा धनादेश (अर्थसाह्य केल्याबद्धल) दिल्याबद्दल  प्रा.प्रमिला कोपर्डे तथा रामकली पावसकर यांचा सत्कार प्रा.जया सागडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेव्हा सत्कारास उत्तर देताना प्रा.पावसकर बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या,”बाळासाहेब देसाई कॉलेज,पाटण येथे काम केल्याने तेथील आठवणी कायम मनात आहेत.अनिल वीरसारखे अनेक आवडीचे विद्यार्थी,तेथील सामाजिक घडामोडी,इंदिरा नगरमधील वास्तव परिस्थितीआदी बाबीमुळे मी तिथेच आजही रमत असते. कौटुंबिक स्नेह,जिव्हाळा हा रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असतो.”

माहेर सातारा असले तरी आजही पाटणच्या मातीवर खरोखर मनापासून प्रेम असल्याचाही प्रा.पावसकर मॅडम यांनी पुनरुच्चार केला.   प्रा.जया सागडे म्हणाल्या, “प्रा.पावसकर यांनी दिलेली देणगी माझ्या हस्ते प्रतिष्ठानला वितरीत करण्यात आली.मी मात्र निमित्त ठरले.असो.पुस्तकातील कायदा समाज पटलावर यायला पाहिजे.सामाजिक सुधारणा करण्यासाठी धार्मिकतेचा अडसर आला तर सरकार हस्तक्षेप करू शकते.” कायद्यासंदर्भात प्रा.सागडे यांनी अनेक उदाहरणे देऊन खऱ्या अर्थाने संविधान जागृती केली.

     अध्यक्ष दिनकर झिंब्रे म्हणाले, “संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने समाजोपयोगी व समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात.त्यास मदतीचा ओघ उत्तरोत्तर सुरू असला तरी प्रारंभी,संस्थापक सदस्य कॅप्टन साहेबराव बनसोडे यांनी पायपीट करून १०-१० रुपये देणगी स्वरूपात मिळविले होते.अशा पद्धतीने गेले सदतीस वर्षे अखंडपणे चालवलेल्या प्रबोधनाच्या  कार्यासाठी भरघोस आर्थिक मदत मिळत असते. आमच्या आक्का (पावसकर मॅडम)  यांनी अर्थसाह्य केल्याबद्धल प्रतिष्ठान कायम ऋणी राहील.”

        प्रा.रामकली पावसकर यांनी प्रा.जया सागडे यांच्याकरवी प्रतिष्ठानास धनादेश सुपूर्द केला. प्रा.रामकली पावसकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिनकर झिंब्रे यांनी प्रास्ताविक व दोघींचा परिचय करून दिला.उपाध्यक्ष रमेश इंजे व ऍड.हौसेराव धुमाळ यांनी स्वागत केले.यशपाल बनसोडे यांनी आभार मानले. प्रा.प्रशांत साळवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व  अनेक संघटनांचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here