पोलीस आणि दलालामुळे शहरात अवैध धंदे करणाऱ्या गुंडांचा नंगानाच सुरु : विजय वहाडणे

0

कोपरगाव : कोपरगाव शहरात पोलिसा आणि गुंडाच्या दलालांच्या police and brokers अभद्र युतीमुळे अवैध धंदे Gangsters doing illegal business बिनबोभाट सुरु असून त्यावर पोसल्या जाणाऱ्या गुंडांचा अक्षरश: नंगानाच सुरु असून शहर आणि ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले आणि देशमुख साहेब आपण करता तरी काय असा सवाल माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे Vijay Wahadane यांनी उपस्थित केला आहे.                             

 कोपरगाव शहर आणि तालुक्यामध्ये बोकाळलेल्या अवैध धंदे आणि गुंडगिरीच्या पार्श्वभूमिवर विजय वहाडणे यांनी आज पत्रकार परिषद घेत पोलिसांवर घणाघाती आरोप केले. वहाडणे पुढे म्हणले की शहरामध्ये मागील काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली त्याची किरकोळ तक्रार दाखल करण्यात आली. येवला रस्त्यावरील हॉटेलमध्ये हॉटेल व्यवस्थापकाला भोसकून गंभीर जखमी करण्यात आले. येवला रस्त्यावरीलच व्यापाऱ्यांची ७ दुकाने रात्रीतून फोडण्यात आली मात्र त्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी तक्रार दाखल करू दिली नाही . तक्रार दाखल करायची असल्यास खरेदी बिले दाखवा ,पोलीस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागतील अशी भीती दाखवली जाते . साहेब यात बदल करा .शहर आणि तालुक्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राखा ,जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका .अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून जनआंदोलन करावे लागेल असा इशाराही वहाडणे यांनी यावेळी दिला . 

शहर आणि तालुक्यातील दारू , मटका ,जुगार , ऑनलाईन गेमिंग वाल्यांकडून दर महिन्याला हप्ते गोळा केले जाते . या अवैध धंदे करणाऱ्यांकडून हप्ते गोळा करण्यासठी त्यांच्यातीलच काहीना दलाल (एजेंट) म्हणून नेमले आहेत .आणि हेच एजेंट दिवसभर पोलीस स्टेशनच्या आत बाहेर ठाण मांडून असतात . कोठेही काही गुन्हा घडल्यास पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये तोडपानी करण्याची भूमिका इमाने इतबारे निभावतात . याचमुळे गुन्हेगारांना पकडल्या जाण्याची किंवा कोणत्याही कारवीची भीती राहिली नाही . त्यामुळे शहरातील खुले नाट्यगृह समोर , येवला नाका,साईबाबा चौफुली, संजीवनी कारखाना परिसर ,कोळपेवाडी कारखाना , धारणगाव रस्ता, मनई सवन्त्सर आदी भागामध्ये वरील अवैध धंदे बिनबोभाट सुरु आहेत. यावर वेळीच कारवाई न झाल्यास आपण जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे संबधित अधिकाऱ्यांची नावानिशी आणि पुराव्यासह तक्रार करणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here