अहमदनगर – साईबाबांच्या सर्वधर्म शिकवणुक संदेशाची वचने भक्तांच्या हृदयपर्यंत उत्सवी वातावरणात अध्यात्मिक स्पंदने निर्माण करणारा बालभजन महोत्सवाचा आनंद नगरमध्ये रसिकांनी लुटला
बालगायक – वादकांना भजनाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळून त्यांच्यात अध्यात्मिक सदभावनांची पेरणी व्हावी, या उद्देशाने गेली 13 वर्षे सातत्याने श्री सत्यसाई सेवा समितीच्या नगर शाखेच्या वतीने राज्यस्तरीय श्री सत्यसाई बालभजन महोत्सवाचे आयोजन साईभक्त अशोक कुरापाटी यांनी केले होते, त्यात राज्यभरातून सुमारे 150 बालगायक – वादकांनी भाग घेऊन श्री सत्यसाईबाबांच्या भजन सेंटरमध्ये गायणारी भजने आपल्या मधुर स्वरात ताल वाद्यांसह सादर करुन आपला परिष लहान नाहीच हे दाखवून दिले.
दूरदर्शन वाहिनी वरील ‘मी होणार सुपरस्टार’ मधील महाविजेता जालन्याचा चि.संकल्प संभाजी काळे उपविजेती अकोल्याची विदर्भकन्या कु.श्रुती रविप्रकाश भांडे, सर्वोत्कृष्ट मानकरी पुण्याची कु.श्रेया युवराज गाढवे या 10 वर्षीय बालगायकांनी दीपप्रज्वलन करुन साईभजने सादर करुन महोत्सवाचे उद्घाटन केले. त्यांनी गोडआवाजात सादर केलेली भजने, भक्तीगीते, लोकगीते, शास्त्रीय गायनाने भक्तीरसाची उधळण करुन वातावरण भक्तीमय केले. त्यांच्या आवाजातील विविधता, लयकारी, आलापीची मांडणी, तानाचे गमक, समज अनोख्या पारंपरिक शैलितील मैफिलित रसिकांची दाद मिळविली. या सादरीकरणाला नगरकरांनी उभे राहून टाळ्याच्या गजरात उत्स्फुर्त
माणसाला विकारापासून दूर नेण्याची किमया संगीत साधना व अध्यात्मिक प्रगतीत असल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले. राज्यभरातून सुमारे 17 संघानी भजने सादर करतांना तालवाद्यांची साथ बालकांनी देवून सुरेख साथ दिली. संयोजक अशोक कुरापाटी यांनी श्री सत्यसाईबाबांच्या मानवी कल्याण, अवतार कार्याची व संगीतावरील मनस्व प्रेमाची माहिती दिली.
विजय साबळे यांनी सूत्रसंचालन केले. श्री सत्यसाई सेवा समितीचे जिल्हाप्रमुख नंदलाल भालेराव, अनिल व रेखा शर्मा, निमंत्रक नरसिंग-शोभा दुसा, अमोल सप्तर्षी, पद्मा बोगा यांच्या हस्ते प्रमुख अतिथी बालगायकांचा सन्मान करण्यात आला. छोटे उस्तादांसमवेत सहभागी विद्यार्थ्यांनी सेल्फी काढून वेगळा स्वरानंदी आनंद लुटला.