रेसिडेन्शियल’ विद्यालयाचा हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा खडांबेत समारोप 

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी  :

          अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे  रेसिडेन्शियल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिर खडांबे येथील ‘श्री शाहू विद्या मंदीर’ समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनबरोबरच भावी आयुष्यात श्रम प्रतिष्ठा ही महत्त्वाची असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.  अहमदनगर येथिल रेसिडेन्शिअल  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर राहुरी तालुक्यातील खडांबे येथिल श्री शाहू विद्या मंदिर  येथे पार पडले.श्रमसंस्कार शिबिर समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दरे बोलताना होते.

श्रमसंस्कार शिबिरात रेसिडेन्शियल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ५० विद्यार्थी व श्री.शाहू विद्या मंदिर चे ७०४ विद्यार्थ्यांचे एकञित शिबिर घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, खडांबे येथिल वांबोरी रेल्वे स्टेशन आणि शाळेसभोवतालच्या संपूर्ण परीसरातील स्वछता केली.चार दिवस सुरू असलेल्या या शिबिरात दररोज सायं. विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली. यामध्ये प्रामुख्याने प्रा. बाळासाहेब निमसे -पतलंजली योग समिती,  पी. एस.साठे – समाजसेवा, प्रा. सीताराम काकडे- राष्ट्र निर्मितीसाठी युवकांचे योगदान, प्रा. नानासाहेब हरिश्चंद्रे- आहारविषयक मार्गदर्शन, डॉ. अमोल बागुल- आईची महती, डॉ. नवनाथ वाव्हाळ- वारसा स्थळांचे संवर्धन आदी विषयांवर विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक  व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.

                या कार्यक्रमसाठी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजय पोकळे, श्री शाहू विद्या मुख्याध्यापक जयसिंग नरवडे, पर्यवेक्षक आप्पासाहेब शिंदे,आदींच्या उपस्थित श्रम संस्कार शिबिराचा समारोप करण्यात आला.

             यावेळी  सुरसिंगराव पवार, माजी सररपंच प्रभाकर हरिश्चंद्रे, पत्रकार दिपक हरिश्चंद्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंशबापू आवारे,भानुदास कल्हापूरे, गुलाब पवार आदीसह विविध मान्यवर व शिक्षकवर्ग उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जालिंदर पिंपळे,दिपक जाधव, अविनाश रामफळे,संतोष कार्ले,संदीप बांगर,प्रसाद साठे, सुरेश देशमुख,तुकाराम कोरडे, अर्जुन लंगोटे, मिनीनाथ कुसमुडे, श्रीकांत म्हसे, अरविंद कुमावत,सिकंदर सय्यद,कानिफनाथ दुशिंग, श्रीमती अजंली आसाल,मंजुश्री डंबरे, योगीता म्हस्के, प्रणाली पवार, शैलजा कल्हापुरे, बाळासाहेब मेहेत्रे, अविनाश अमृते आदीनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन राहुल जाधव व संजय रोकडे यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here