सातारा/अनिल वीर : जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए ) चे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांची पश्चिम महाराष्ट्र लोकसभा मतदार संघासाठी निरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.कार्यकारणीच्या चेंबूर येथील पक्षाचे अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहविचार सभेत ओव्हाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांनी येऊ पाहणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा प्रभारी व लोकसभा अध्यक्षांच्या नियुक्ती केलेल्या आहेत.यात मुंबई, कोकण,पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा खानदेश अशा विभागांच्या लोकसभा प्रभारी नियुक्त्या केलेल्या आहेत.पश्चिम महाराष्ट्राच्या पर्यवेक्षक (निरिक्षक)हणून दादासाहेब ओव्हाळ यांची नियुक्ती सर्वानुमते एकमताने करण्यात आली आहे. . पुणे विभागीय १० लोकसभेच्या प्रभारी व अध्यक्ष यांच्याही नियुक्ती व त्या त्या लोकसभेतील विधानसभा संघटक करणे व निवडी करणे हे काम होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत.ते पुढीलप्रमाणे
पुणे – अरुण भिंगारदिवे, बारामती – सचिन भाऊ खरात,मावळ – कैलाश जोगदंड व शिरुर – अप्पासाहेब गायकवाड.
लवकरच कोल्हापूर व सोलापूर दौरा करून लोकसभा प्रभारी व अध्यक्ष पदाच्या निवडी करणार असल्याचे दादासाहेब यांनी सांगितले.यावेळी राज्य सचिव रमेश भोईर व अरुण भिंगारदिवे, संघटक कैलास भाऊ जोगदंड, आप्पासाहेब गायकवाड, अकोला जिल्हा प्रभारी सचिन भाऊ कोकणे,पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खरात व अंकुश चव्हाण,अमोल खंडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राज्य सचिव अशोक ससाने व नितनवरे यांनी सूत्रसंचालन केले.राजू ओव्हाळ यांनी आभार मानले.