सातारा/अनिल वीर : रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची सहविचार सभा येथील संपर्क कार्यालयात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प.महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष संजयराव देखणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पश्चिप महाराष्ट्र विभागासह पाच जिल्ह्यातील दहा जिल्हाध्यक्ष यांचीही सदरच्या सभेत समावेश होता. पक्षाची ताकद पश्चिम महाराष्ट्रात वाढविण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी यांनी एका विचाराने काम करणे गरजेचे आहे. महीन्यातून एक बैठक होणे गरजेचे आहे. तसेच जिल्हाध्यक्ष यांनी तालूका, शहर, जि.प./प. स. /ग्रामशाखा/ बुथ कार्यकारिणी निवडताना एका व्यक्तीला निवडीचे पत्र न देता त्या त्या ठिकाणी कमीत कमी १५ ते २० कार्यकर्त्यांची बैठक घेऊनच सर्वानुमते निवडी कराव्यात. त्याशिवाय कार्यकारिणी गृहीत धरली जाणार नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित रहायचे आहे. सदरची पक्षाची पहीलीच सहविचार सभा होती. प्रारंभी, शहरातील डॉ..बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राज्य कमीटीचे उपाध्यक्ष संजयराव देखने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाहीर कालकथीत माधव भोसले यांना सामूहीक आदरांजली वाहण्यात आली.त्यानंतर मान्यवरांना पूष्पगूच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदरच्या सभेत जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.
“सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढीचे काम करावयाचे आहे. गैरहजर आहेत त्यांना समज देण्यात यावी. शिवाय,खुलासाही अध्यक्षांनी घ्यावा. तद्नंतर राज्य कमीटीच्या मिटींगमघ्ये सादर करावा.”असे मार्गदर्शन राज्य कमीटीचे उपाध्यक्ष संजयराव देखने यांनी केले. सदरच्या सभेस पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सागर गायकवाड, सदस्य गणेश कारंडे, पुणे जिल्हाध्यक्ष संदिपराव रंधवे,पुर्व सातारा जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड,पश्चिम साताराध्यक्ष विशाल भोसले,पुणे महीला आघाडी अध्यक्षा सौ. भिमाताई तूळवे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष लहू अमराळे,सौ अनीताताई बागडे आदी पदाधिकारी यांच्यासह सुधाकर काकडे,श्रीरंग वाघमारे व कार्यकर्ते उपस्थित होते .
फोटो : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर.(छाया-अनिल वीर)