बालिकेच्या मृत्यूप्रकरणी  हॉस्पिटलच्या डॉक्टरवर गुन्हा  दाखल करा – प्रवीण कानवडे यांची मागणी 

0

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे मेंढ्या पालन करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातून आणलेल्या अल्पवयीन बालिकेच्या मृत्यूप्रकरणी संबंधित हॉस्पिटल व त्या डॉक्टरांवर  गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.                              

        <p> या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील काही दिवसापूर्वी मेंढी पालन करण्यासाठी शिंदोडी तालुका संगमनेर येथील एका कुटुंबाने नाम मात्र पैसे देऊन इगतपुरी तालुक्यातील दहा वर्षाच्या मुलीला आणले होते. त्यानंतर या मुलीला अचानक अकोलेरोड येथील गीतांजली  हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते. अचानक मुलीच्या तब्येतीला काय झाले ? मुलीची अवस्था बघता सदर हॉस्पिटलने सर्वात प्रथम पोलिसांना एमएलसी साठी खबर देणे गरजेचे असताना देखील उपचार सुरू ठेवले. पोलिसांना कुठलीही खबर दिली नाही.मुलीला काय आजार होता, काय घटना झाली होती. तिच्या गळ्याभोवती जखमा कशा ? मुलीची परिस्थिती नाजूक होती तर इतर हॉस्पिटलमध्ये का हलविण्यात आले नाही. मुलीच्या कुटुंबीयांना त्वरित का कळवण्यात आले नाही. <p>पीडित मुलगी पुन्हा या मेंढपाळ कुटुंबाकडे कशी ताब्यात गेली हे सर्व प्रकार संशयास्पद असून तिच्या मृत्यूला गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. वैद्य हे देखील तितकेच जबाबदार असून त्यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही प्रवीण कानवडे यांनी दिलेल्या निवेदनात दिला असून संबंधित हॉस्पिटल संबंधी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.  पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना दिलेल्या निवेदनावेळी राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कानवडे, जालिंदर राऊत, संपर्क प्रमुख दिनकर घुले, शहराध्यक्ष दीपक चोरमले, उपाध्यक्ष विलास रसाळ, कार्याध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, तसेच छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय पवार,  राजू चरवंडे, वासुदेव महाराज सोनवणे, अक्षय पन्हाळकर राजू उदवंत सोमानाथ  कुलथे, चंद्रकांत पवार आदींसह सह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here