सातारा/अनिल वीर : श्रीक्षेत्रपार्वतीपुर (पार),ता. महाबळेश्वर येथे गुरुवार दि.४ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामवरदायिनी मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ७ वा.पूजाविधी प्रारंभ, गणेशपूजा,प्रधानकलश,पंचकलश,कात्यायनी,अभिषेक व होमहवन होणार आहे.१० वा. गावच्या वेशिवरील मारुती मंदिर ते मूल घाटमाथा-श्रीची मिरवणूक व श्री.ष.ब्र.१०८ महादेव शिवाचार्य महास्वामी वाईकर महाराज यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी व श्रीरामवरदायिनी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. दुपारी १२ वा. आशीर्वचन,१ वा.पूर्नाहुती व महामंगल आरती, २ वा. महाप्रसाद.सायंकाळी ४ वा. धार्मिक विधी व रात्रौ ९ वा. भजनांचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे.तेव्हा भाविकांनी वेळेवर उपस्थित राहुन लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.