श्री दत्त जयंती उत्सवनिमित्त मा. आ. मनोहरशेठ भोईर यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील श्री दत्तगुरुचें घेतले दर्शन

0

उरण दि २९(विठ्ठल ममताबादे ) : मार्गशीर्ष पौणिमा मंगळवार दिनाकं २६ डिसेंबर २०२३ रोजी श्री दत्त जयंती निमित्त माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील श्री दत्तगुरुचें  दर्शन घेतले, या मध्ये उरण शहरातील संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या देऊळवाडी येथे दत्तजयंती यात्रे निमित्त  शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार  मनोहरशेठ भोईर व पत्नी मालतीताई भोईर यांनी दत्त मंदिरात जाऊन श्री दत्तगुरुचें दर्शन घेतले.

तसेच उरण विधानसभा मतदारसंघातील चिरनेर, पणदिवे, नवीन शेवा, करंजा-श्री गणेशनगर ,उरण, देवलोळी, शिवाजीनगर, कसलखंड, उळवे नोड येथील श्री दत्तगुरुचें माजी आमदार  मनोहरशेठ भोईर दर्शन घेतले, यावेळी  त्यांच्या सोबत उरण तालुकाप्रमुख  संतोषभाई ठाकूर, पनवेल तालुकाप्रमुख  रघुनाथशेठ पाटील, शिक्षक नेते नरेश मोकाशी, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here