सुप्यात सहा जानेवारीपासून प्राजक्ता व्याख्यानमाला

0

बारामती : तालुक्यातील सुपे येथे शनिवारपासून (दि. ६) तीन दिवस प्राजक्ता व्याख्यानमाला होत आहे.सुपे परगणा ग्रामस्थ व दानशूरांच्या सहकार्याने जीवन साधना फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने प्राजक्ता मतिमंद विद्यालयाच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे दहावे वर्ष आहे.

           शनिवारी (दि.६) प्रा.रवींद्र येवले सेवानिवृत्त प्राचार्य, मुधोजी हायस्कूल फलटण, यांचे ‘मला आनंदाने जगायचय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच, या दिवशी सकाळी ११ वाजता मोफत  दंतरोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे.  पुण्यातील आरोग्यम धनसंपदा या संस्थेच्यावतीने हे शिबिर होत आहे.  रविवारी (दि.७) श्री. सतीश बुद्धे,  गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सातारा यांचे ‘माझ्या पगारात माझं भागत’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवार (दि.८) श्री. ज्ञानेश्वर बोडके अध्यक्ष-अभिनव फार्मर्स क्लब, महाराष्ट्र, पुणे यांचे ‘एक एकर शेती, एक देशी गाय, थेट विक्री, समृद्ध शेतकरी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

मंगळवारी २३ जानेवारी २०२४ रोजी हिंदवी स्वराज्याचे संकल्पक श्रीशहाजीराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जेजुरी येथील  निलेश जगताप, युवा व्याख्याते यांचे ‘स्वराज्यसंकल्पक श्रीशहाजी महाराज ते स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानाची वेळ रात्री आठ असून, या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here