कामगार नेत्या श्रुती शाम म्हात्रे यांना शाम म्हात्रे स्मृती ” कामगार मित्र ” गौरव पुरस्कार जाहीर.

0

उरण दि ५(विठ्ठल ममताबादे ) : पनवेल तालुक्याचे नामांकीत शिक्षण संस्था प्रशिक सोसायटीच्या वतीने दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना प्रशिक सन्मान देऊन गौरव करण्यात येत असतो. यावेळी प्रशिक सन्मान २०२३ च्या मानकरी ठरल्या आहेत श्रुती शाम म्हात्रे यांनी कामगार क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल व  कामगार क्षेत्राच्या अलौकिक कार्याबद्दल त्यांना शाम म्हात्रे स्मृती ” कामगार मित्र ” गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार रायगड पब्लिक स्कुल, देवीचा पाडा या शाळेच्या प्रांगणात दि. ६ जानेेवारी २०२४ रोजी सायं. ४:०० वाजता केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री भारत सरकार मा. रामदासजी आठवले  यांच्या हस्ते दिला जाणार असुन याबद्दल श्रुती म्हात्रे ह्यांचे संपुर्ण तालुक्यातून अभिनंदन होत आहे. कामगार क्षेत्रामध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण असुन कामगार चळवळीमध्ये काम करणाऱ्या श्रुती म्हात्रे यांच्यावर सर्व कामगारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असुन कार्यक्रमावेळी  सर्व कामगारांनी कार्यक्रमस्थळी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here