भाजप ओबीसी मोर्चाच्या महिला नगर शहर जिल्हाध्यक्षपदी स्वाती पवळे

0

मोदींच्या लोकप्रियतेमुळे भारताची प्रतिमा जगभरात उंचावली-बाळासाहेब भुजबळ

     नगर – ‘सबका साथ सबका विकास’ या ब्रीद वाक्यप्रमाने भारतीय जनता पार्टीचे काम सुरू आहे. शासकीय योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी करावे. तसेच पक्ष संघटनेसाठी काम करुन पक्ष मजबूत व बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या मार्गदर्शनानुसार ओबीसी मोर्चाचे नगर शहरात चांगले संघटन झाले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामामुळे देशात मोठी प्रगती होत आहे. मोदी यांचे नेतृत्व विश्व मान्य असून त्यांच्या लोकप्रियतेमुळेच भारताची प्रतिमा जगभरात उंचवली आहे. असे प्रतिपादन अ.नगर ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले.              

     नाशिक,सातपूर येथील अयोध्या सभागृहात ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत महिला मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक मनीषा चौधरी-गोराणे यांच्या हस्ते अ.नगर शहर जिल्हा ओबीसी महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र स्वाती पवळे यांना देण्यात आले. यावेळी ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ बोलत होते.

     याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, प्रदेश भाजपचे सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस गुरुदेव कांदे, बापू घडामोडे, विनोद दळवी, युवा संपर्कप्रमुख महाराष्ट्र मच्छिंद्र सानप, उत्तर महाराष्ट्र प्रभारी दीपक पवार, संपर्कप्रमुख भरत महाजन, प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र चव्हाण, सह संपर्कप्रमुख मनोज ब्राह्मणकर, नाशिक ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजय आघाव, अ.नगर ओबीसी मोर्चाचे दक्षिण जिल्हा सरचिटणीस संतोष म्हस्के, शहर जिल्हा सरचिटणीस राजू मंगलारप, अनिल निकम, उपाध्यक्ष कुंडलिक गदादे आदी उपस्थित होते.

     प्रदेशाध्यक्ष संजय गाते म्हणाले,ओबीसी मोर्चा येत्या लोकसभेत भाजपाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी समर्पित भावनेने काम करेल.तसेच नगर शहर जिल्हा ओबीसी मोर्चाच्या कामाचा नामौल्लेख करत कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here