पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले 

0

आमदार लहू कानडेची जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार, विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी 

              महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नगर  जिल्ह्यात पिकांच्या पंचनाम्यासाठी पैसे मागितले जाणाच्या तक्रारीत दिवसेंदिवस भर पडत आहे.  नेवाशा पाठोपाठ राहुरी तालुक्यातील खुडसरगाव ता.राहुरी येथे अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैसे मागितल्याचे प्रकार समोर आला आहे. याबाबत आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार करून विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचा इशारा दिला आहे.

             नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे शेती पिकाच्या पंचनाम्यासाठी पैसे मागीतल्याचा प्रकार घडला असता कृषी सहायक, ग्रामसेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची घटना ताजी असताना राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील आप्पासाहेब देठे,  अभिमन्यू चव्हाण, किशोर देठे, प्रकाश थेवरकर आदींनी तसेच पाथरे येथील शेतकऱ्यांनी महसूलच्या कर्मचारी पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी आ.कानडे यांच्याकडे केली.आ.कानडे यांनी  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार करून विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.

             आ.कानडे यांनी या बाबीची गंभीरपणे दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली आहे.  प्रशासनाने संबंधितांवर कारवाई केली नाही तर विधानमंडळात आवाज उठविणार असल्याचा इशारा आ.कानडे यांनी दिला आहे. 

               नेवासा तालुक्यातील महसूल विभागाच्या तक्रारीवर महसूलमंत्री विखे यांनी तातडीने लक्ष घालून संबंधीत कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कार्यवाही तातडीने केली. आता श्रीरामपूर मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार पुढे आल्याने ना.विखे काय कारवाई करणार याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. 

ReplyReply allForward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here