भानुदास सावंत यांच्या निवडीने तारळे भागात आनंदाला पारावार उरला नाही !

0

सातारा/अनिल वीर : खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी भानुदास सावंत यांची बिनविरोध फेरनिवड व पुरस्कार मिळाल्याने तारळे भागात आनंदाला पारावार उरला नाही.

      भारतीय बौद्ध महासभेचे तारळे विभागीय अध्यक्ष भानुदास सावंत यांना या वर्षात दोन पुरस्कार व संचालक म्हणूनही पुन्हा संधी मिळाल्याने शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवल्याने परिसर खरोखर आनंदून गेला आहे.भानुदास सावंत हे एक शांत,संयमी, अभ्यासू,निगर्वी,अभ्यासू अन् सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व  काम करणारे जेष्ठ व्यक्तिमत्व आहे. त्यांना बंधुत्व प्रतिष्ठानचा “समाज-धम्मरत्न पुरस्कार” मिळाल्याने जाधववाडी येथे तारळे भागाच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला होता. यावेळी दस्तुरखुद्द प्रतिष्ठानचे  संस्थापक अनिल वीर व मान्यवर उपस्थित होते.

  तारळे बौध्द विकास संस्था व भारतीय बौध्द महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने व तारळे भाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.व सौ.सावंत या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल रोकडे,गौतम माने,सुनिल माने, किशोर धरपडे,बाजीराव न्यायनीत, मधुकर जगधनी, आनंदा भंडारे,विजय भंडारे (बांबवडे), राजेंद्र,सावंत, धनाजी कांबळे,वसंत कांबळे, आदित्य कांबळे,भिमराव सप्रे,मधु भिसे,राजू सप्रे,उत्तम सप्रे,गणपत सप्रे,सिध्दार्थ सावंत व तारळे विभागातीत उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

फोटो : भानुदास सावंत यांच्या सत्कारप्रसंगी मान्यवर.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here