उरण आगारात सुरक्षितता अभियान २०२४ चे शुभारंभ 

0

उरण दि १४(विठ्ठल ममताबादे ) : रा. प. महामंडळाच्या कार्यपध्दतीमध्ये नविन वर्षाच्या सुरवातीला “रस्ते वाहतुकीत सुरक्षीत प्रवास” हा अत्यंत महत्वाचा भाग म्हणुन प्रवाशांची सुरक्षीत वाहतुक सेवा करणारे महामंडळ म्हणुन रा. प. बसेसचे रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी रा. प. महामंडळाकडुन दरवर्षी अपघात नियंत्रण उपाययोजना राज्यभर राबविण्यात येते. त्याकरीता सुरक्षीतता अभियान राबविण्यात येते.

यावर्षी रा. प. मुंबई विभागात उरण आगारात “सुरक्षीतता अभियान- २०२४” चे अभियान राबविण्याकरीता या अभियानाच्या उत्कृष्ठ शुभारंभाकरीता उरण तालुक्यातील जेष्ठ साहित्यीक व रायगडभुषण एल्. बी. पाटील, द्रोणागिरी स्पोर्टस क्लब असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत , ग्राम अध्यक्ष  मोहन भोईर व मुंबई विभागाचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राजेंद्र भामरे यांनी उपस्थिती दर्शवुन सुरक्षितता मोहीम फलकाचे अनावरण केले व उरण आगारातील अपघात विरहीत सेवा कर्तव्य देणारे जेष्ठ चालक श्री. भिलारे,  अमोल काटे, शिवाजी भोसले,  सुनिल पाटील,  कैलास भालेराव यांना गुलाब पुष्प व सुरक्षीत सेवा बिल्ले देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उरण आगारात कार्यरत असलेल्या महिला यांत्रिक कर्मचारी  कादंबरी हर्षल म्हात्रे यांना  “भुमिकन्या” पुरस्कार घोषित झाल्याने त्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रा. प. उरण आगारात “दिवाळी जादा हंगामात उत्कृष्ठ” उत्पन्न आणणारे वाहक आर. एस. तिवारी, व्हि. आर्. भाबड व एस. पी. पालवे यांनाही सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यकमाचे सुत्रसंचालन आगारातील  विलास जाबरे व  सुभाष पालवे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी उरण आगाराच्या कार्यप्रणाली बाबत कौतुक केले. आगाराचे अपघात विरहीत सेवा दिल्याबद्दल व इंधन बचतीत पारितोषीक मिळण्याबद्दल अभिनंदन करुन यशोप्राप्तीकरीता शुभेच्छा दिल्या. उरण आगाराचे पालक अधिकारी  राजेंद्र भामरे यांनीही कर्मचाऱ्यांना प्रबोधन केले. सदर कार्यकमाचे नियोजन धिरज पाटील, अमोल पाटील,  दिपक म्हात्रे व महेंद्र भगत यांनी केले. आगार व्यवस्थापक सतीश मालचे व वाहतुक निरीक्षक अमोल दराडे यांनी मान्यवर प्रमुख पाहुन्यांचे व आगारातील कर्मचाऱ्यांचे आभार मानुन सुरक्षीत अभिमानाचा शुभारंभ करुन शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here