बंद स्थितीत असलेले पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान लवकरच पर्यटकांसाठी सुरू होणार.पालकमंत्री संदिपान भुमरे.

0

पैठण,दिं.२८.(प्रतिनिधी) :  गेल्या अनेक वर्षांपासून बंद स्थितीत असलेले श्री क्षेत्र पैठण येथील श्री संत ज्ञानेश्वर उद्यान सुरू करण्यासाठी राज्याचे रोहयो तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पाठपुरावा करुन संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी २१२ कोटीचा विकास आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

  पर्यटकांनासाठी संत ज्ञानेश्वर उद्यान येत्या मार्च मध्ये चालू करण्यासाठी तातडीचा ५ कोटीचा निधी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

   पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील सद्यस्थितीत दोन चॅनल मधील कारंजे काम पुर्ण झाले आहे.याची पाहणी दि.26 जानेवारी सायंकाळी 6 वाजता पालकमंत्री संदिपान भुमरे व जायकवाडी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता समाधान सबीनवार , कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता दिपक डोंगरे यांनी करून पत्रकारांशी संवाद साधला या दरम्यान पालकमंत्री भुमरे हे बोलत होते.

संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने बंद पडले होते. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन उद्यानासाठी निधी मंजूर केला.संत ज्ञानेश्वर उद्यानातील होणार असलेल्या सर्वच बाबी योग्य पध्दतीने दाखवण्यात आल्या याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता समाधान सबीनवार,कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता दिपक डोंगरे, शाखा अभियंता तुषार विसपुते, विजय काकडे,बंडू अंधारे, राज्य दुध संघाचे संचालक नंदलाल काळे,नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, स्विय सहाय्यक नामदेव खराद पाटील ,उद्यान बचाव समितीचे प्रा. संतोष गव्हाणे, प्रा.संतोष तांबे,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया, रमेश लिंबोरे, बाळु आहेर, विजय लोहीया,विजय सुते, संतोष गोबरे, शहादेव लोहारे, रघुनाथ ईच्छय्या, कंत्राटदार संजय भंडारी,फाउंटनचे श्री पटेल,राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील हुड,संजय भंडारी, नंदकुमार पठाडे, नवगांवचे सरपंच किशोर चौधरी, नगरसेव भूषण कावसानकर, शिवसेना युवानेते किशोर तावरे पाटील, नगरसेवक बाळासाहेब माने सह याप्रसंगी मोठ्या संख्येने उद्यान प्रेमी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here