कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी गोरक्षनाथ पवार यांची निवड..

0

कोपरगाव ( वार्ताहर)

लोककला कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने कवी आणि कवयित्रीनां महाराष्ट्र राज्य आयोजित एक दिवसीय साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे कवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी गोरखनाथ पवार यांची निवड करण्यात आली आहे.

वडाळा महादेव येथे 10 मार्च रोजी होणाऱ्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ते दिसणार आहे . लोककला कलावंत साहित्यिक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कवी बाबासाहेब पवार यांनी पत्राद्वारे तसे त्यांना कळविले आहे‌ गोरखनाथ पवार यांनी अनेक कवी संमेलनातून रसिकांना मंत्रमुक्त केले आहे त्यांच्या या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे‌ हे संमेलन 

 वडाळा महादेव ता. श्रीरामपूर जि. -अहमदनगर येथे आयोजित केले आहे. तरी सर्व कवी,आणि कवयित्री यांनी १०मार्च २०२४रोजी सकाळी ठिक ११ वाजता हाजर रहावे असे आवाहन पवार यांनी केले आहे. इच्छुक कवी व कवयित्रींनी  लोककला कलावंत साहित्यिक परिषद सर्व आयोजक संपर्क करावे असे आवाहन पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here