भारतीय सिंधू सभाच्या वतीने शहिद हेमू कालानी जयंती साजरी

0

नगर – भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक युवा स्वातंत्र्य सैनिक सिंधी सुपूत शहिद हेमू कालानी यांची 101 वी जयंतीचा कार्यक्रम भारतीय सिंधू सभेच्या नगर शाखेच्यावतीने नुकताच श्रद्धा हॉटेल सभागृहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.अर्जुन गुरनानी उपस्थित हाते. Martyr Hemu Kalani Jayanti Celebration on behalf of Bharatiya Sindhu Sabha

     कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली, नंतर शहिद हेमू कालानी यांच्या प्रतिमेस सर्वांनी पुष्पांजली अर्पण केली व केक कापून जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष दामोदर बठेजा यांनी दिन विशेषचे महत्व सांगत भारतीय सिंधू सभेच्या कार्य व उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली.

     प्रा.ए.के.गुरनानी यांनी मनोगत व्यक्त करतांना शहिद हेमू कालानी यांच्या शौर्य व धाडसा विषयी सखोल माहिती दिली. हेमू कालानी यांचा जन्म 23 मार्च 1923 रोजी सक्कर येथे झाला. बालपण सरले, शिक्षण, उच्च शिक्षण पार पडले त्यांचे काका डॉ.मंघाराम कालानी स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन हेमू ‘स्वराज्य सेना’ या क्रांतिकारी गटात सामिल झाले व अल्पावधीतच त्यांच्या धाडसी वृत्तीने ते उच्च पदापर्यंत पोहचले. ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावत भारत मातेला मुक्त करण्यासाठी या निडर क्रांतिकारकांचा गट योजना आखत होते. ब्रिटिश सैनिक व दारुगोळा असलेली रेल्वे उडवून देण्यासाठी रुळाच्या फिश प्लेटस् काढण्याचा प्रयत्नांना असतांना हेमू कालानी पकडला गेला. ब्रिटिश सरकारकडून त्यांना देशद्रोही ठरवित फाशीची शिक्षा सुनावली 21 जानेवारी 1943 रोजी ‘इन्कलाब जिंदाबाद आणि ‘भारत माता कि जय’ म्हणत युवा हेमू फासावर गेला. शेवटी प्रा.गुरनानी म्हणाले,देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी शहिद झालेल्या सर्वात तरुण क्रांतिकारकांपैकी हेमू कालानी एक होते.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय सिंधू सभेचे रमेश कुकरेजा, मोती आहुजा, किशोर रंगलानी, द्वारका किंगर, मन्नू कुकरेजा, राहुल बजाज, मुकेश आसनानी, सागर बठेजा, किशन पंजवानी, रुपचंद मोटवाणी, हरगोविंद चिमनानी, गोविंद तलरेजा, विकी चुग,पप्पन तलरेजा, चंदू बालानी, अशोक नवलानी, जियंद रोहिडा, ओम कुकरेजा, सीए रोहिडा, उत्तम छुटाणी, प्रेम बजाज, सुनिल दंडवानी, अजय शादीजा आदिंनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रामशेठ मेंघानी, दामोदर माखीजा आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.

     सूत्रसंचालन जितेश सचदेव यांनी केले, मोती आहुजा यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. शेवटी अशोक आहुजा यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here