सातारा/अनिल वीर : येथील शिवम कॉलनी गडकर आळीमधील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. कारण,विद्युत खांब गंजला असून तो केव्हाही कोसळला जावू शकतो.तेव्हा पालिका प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे.अशी मागणी होत आहे.
येथील खासदार व आमदार यांच्याच वार्डमधील घटना आहे. कुचकामी व गंजलेला विद्युतपोल कोसळण्याच्या स्थितीत आहे. अशी भयावह समस्या असतानाही नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य असे दुर्लक्ष्य झाल्याचे दिसून येत आहे.शिवम कॉलनी गडकर आळी येथील चौकात उभा असणारा विद्युत पोल खालून पूर्णपणे गंजलेला व कुचकामी झाला आहे. याबाबत स्थानिक रहिवाशी राजकुमार गणेश नरुले यांनी दीड महिन्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे नागरीकांमधून तीव्र प्रकारच्या भावना उमटू लागल्या आहेत.याबाबत स्थानिक ठरलेले नगरसेवक किशोर शिंदे यांनीही पाठपुरावा करूनही संबंधित यंत्रणेने डोळेझाक केली आहे. खासदार व आमदारांच्या निवास स्थानापासून काही अंतरावर असणाऱ्या या कॉलनीकडील समस्यांकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.इतर भागातील समस्यांचे काय ? असा सवाल नागरीक करीत आहेत. तेव्हा नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत होत असलेल्या केवळ दुर्लक्षितपणामुळे भविष्यात मोठी हानी होऊ शकते.