महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण
पोहेगांव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद येथील स्व. पंढरीनाथ जोंधळे यांचे नातू मीनानाथ पंढरीनाथ जोंधळे यांचे चिरंजीव अभिषेक मीनानाथ जोंधळे यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत नवव्या रँक मध्ये स्थान मिळवत आपले पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
सरकारी अधिकारी होणे हे तरुणांचे ध्येय असते. जिद्द चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर एमपीएससी यूपीएससी परीक्षा देतात मात्र पहिला दुसरा तिसरा प्रयत्न झाल्यानंतर काहींना अपयश येते , काहींचे स्वप्न भंग होते.मात्र अभिषेक मिनानाथ जोंधळे यांनी पहिल्या प्रयत्नातच ही परीक्षा उत्तीर्ण करत यश संपादन केले.मीनानाथ जोंधळे यांचे हे दुसरे चिरंजीव असून पहिल्या मुलानेही मागील काही वर्षांपूर्वी तहसीलदार पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.पी एस पदी निवड झाल्याबद्दल जोंधळे यांचे पोहेगांव पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.