सातारा/अनिल वीर : जिल्ह्यातील एकमेव भन्ते दिंपकर हे नंदकुमार काळे यांच्या दोन चाकीवरून चिंचनेर-वंदन या आपल्या गावी जाताना रात्रीच्यावेळी अनोळखी दोन चाकीने धडक दिली.त्यामुळे काळे यांना खरचटले असले तरी भन्ते यांच्या एका पायाला मार लागल्याने दोन हाडे मोडली आहेत.म्हणूनच त्यांना येथील श्वास रुग्णालयात दाखल केले आहे.
भन्तेजीवर उपचार चालु असून प्राथमिक सर्व तपासण्याही करण्यात आलेल्या आहेत.ज्या वाहनाने धडक दिली होती.त्याने रात्रीचा फायदा घेऊन पोबारा केला.श्वास रुग्णालय खाजगी असल्याने खर्च मोठ्या प्रमाणावर येणार आहे. महासभा,समिती व इतर संघटनेच्या धम्मबांधवांनी रक्कम एकत्रीत केली आहे. साधारणतः अजून १५ दिवस पूर्ण उपचार घ्यावे लागणार आहेत. जवळच असणाऱ्या खानावळीतून इंजि.रमेश इंजे यांच्यावतीने भोजनाची सोय केली असून त्यांनी आर्थिक दानही केले आहे. अजुनही अधिकची रक्कम लागणार आहे.तेव्हा दानकर्त्यांनी सढळ हाताने प्रत्यक्ष/फोनपे मदत करावी.अधिक माहीतीसाठी सम्बधित ग्रुपवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.असे आवाहन महासभा व समितीच्यावतीने ऍड. विजयानंद कांबळे यांनी केले आहे.