श्री साईगाव पालखी सोहळयासाठी आ. आशुतोष काळेंनी काखेत झोळी अडकवत मागितली भिक्षा

0

कोळपेवाडी वार्ताहर :- श्री रामनवमी निमित्त कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या मैदानावर  श्री साईगाव पालखी सोहळा Saigaon Palkhi ceremony व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने ह.भ.प. चारुदत्त महाराज आफळे यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री विष्णुपुराण महाकथा आयोजित करण्यात आली असून मंगळवार (दि.१६) रोजी आ.आशुतोष Ashutosh Kale यांनी कार्यक्रमास उपस्थित राहत काखेत झोळी अडकवत श्री साई गाव पालखी सोहळ्यासाठी भिक्षा मागितली.

श्री साईबाबा सन्यस्त जीवन जगले. त्यांनी आयुष्यभर काखेत झोळी अडकवून पाच घरी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला व भिक्षा मागुनच शिर्डीत रामनवमी, दिवाळी असे विविध धार्मिक सण व कार्यक्रम साजरे केले आहे. श्री साईबाबा हयातीत असतांना भिक्षा मागूनच भक्तांच्या पोटाची भूक मिटवित असत. त्यामुळे श्रीराम नवमी उत्सवात भिक्षा झोळीला अनन्यसाधारण महत्व आहे. कोपरगाव शहरातून दरवर्षी श्री साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने कोपरगाव-शिर्डी श्री साई पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो. या पालखी सोहळ्यात कोपरगावकर मोठ्या संख्येने सहभागी होत असले तरी या सोहळ्याच्या महाप्रसादासाठी येणारा खर्च हा ज्याप्रमाणे साईबाबांनी भिक्षा मागूनच सण साजरे करत असे त्याप्रमाणे श्री साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाने देखील भिक्षा झोळीची परंपरा पुढे सुरु ठेवत भिक्षा मागूनच हा खर्च आजवर भागविला आहे. बाबांनी आयुष्यभर रंजल्या गांजल्यांची सेवा करून भाविकांकडून घेतले आणि गरजवंताना वाटले. त्याप्रमाणे ही परंपरा आजही जपली जात असून तोच वारसा पुढे चालवितांना श्रीरामनवमीला कोपरगाव वरून जाणाऱ्या साई पालखी सोहळ्यासाठी देखील सुरु असलेल्या कथेच्या दरम्यान परंपरेनुसार आ. आशुतोष काळे यांनी भिक्षा झोळी घेवून भिक्षा मागितली.हि परंपरा मागील अनेक वर्षापासून श्री साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाने जपली असून ती यापुढे देखील अखंडपणे सुरूच राहणार आहे.   

यावेळी श्री साईगाव पालखीचे सुनील फंड, संतोष चव्हाण, राहुल देवळालीकर, महेश उदावंत, विवेक फंड, रोहित खडांगळे, अमोल देवकर, राहुल आदमाने, संजय जगताप, सुनील मोरे, संदीप दळवी, बंटी दळवी, मोनु दळवी, समर्थ दीक्षित, राजेंद्र माळी, ज्ञानेश्वर गोसावी, प्रताप गोसावी, सुनील खैरे, आदित्य लोणारी, मुंबादेवी तरुण मंडळाचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here