सातारा/अनिल वीर : भिमसृष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी या ठिकाणी सलग तिसऱ्या वर्षी प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तेव्हा सागर कांबळे यांना बुद्ध लेणी संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संपूर्ण देशात लेणी संवर्धन तसेच बौद्ध धम्म अभ्यासक सागर कांबळे (बोधिसत्व चॅनल) यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीत व सुजाताताई नवघरे ( मसुरे) यांच्या अध्यक्षतेखाली कंबळे यांना सन्मानीत करण्यात आले.सदरचा महोत्सव पुणे जिल्यातील बुद्ध लेणी मुक्ती आंदोलनद्वारे तसेच बौध्द समाज विकास महासंघ, टाटा मोटर्स फ्रेंड सर्कल, अशोक सर्वांगीण विकास सोसायटी याच्याद्वारे आयोजित करण्यात आला होता. कैलास कांबळे हे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क कराड तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.यावेळी कार्याध्यक्ष भाऊसाहेब डोळस,शिलवन्त परिवार, अनेक पदाधिकारी, लेणीप्रेमी,बौद्ध उपासक, उपासिका व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.