बाळासाहेब आंबेडकर यांची नगरला शनिवारी जाहीर सभा 

0

अहमदनगर :- शनिवारी दि.०४ मे २०२४ रोजी सकाळी ११:०० वा. एन आर लॉन आणि मंगल कार्यालय,नगर औरंगाबाद रोड,अहमदनगर येथे वंचित बहुजन आघाडी व ओबीसी बहुजन पार्टी चे अधिकृत उमेदवार दिलीप कोंडीबा खेडकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर Balasaheb Ambedkar यांचे मार्गदर्शनाखाली जाहीर सभा आयोजित केली आहे.

या सभेस प्रमुख उपस्थितीत राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण,राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, राज्य समन्वयक ॲड अरुण जाधव,एकलव्य संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधव सह अहमदनगर जिल्हा,तालुका,गाव शाखा विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे अशी माहिती जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी दिली.  आदिवासी,भटके,अल्पसंख्यांक,ओबीसी,एसी,एसटी समाजातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे,शहराध्यक्ष हनीफ शेख,भिंगार शहराध्यक्ष जे.डी.शिरसाठ,नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here