साईबाबांच्या शिर्डीत श्रद्धा सबुरी बरोबरच प्रामाणिक कर्मचार्‍यांवर भक्तांचा विश्वास सार्थ !

0

साई संस्थांच्या बसमध्ये विसरुन राहिलेला ऐवज साळूंके यांनी केला परत Saibaba’s Shirdi

     नगर –     भक्त आणि भगवंत यांचं नात अतुट असते. साईंच्या दरबारात येणारे भक्त मोठ्या श्रद्धेने त्यांच्या चरणी लीन होत असतात. शिर्डीत आलेले भाविक साई बाबांच्या दर्शनाने धन्य होतात. अशावेळी आपल्या जवळ असलेल्या किंमती वस्तू, बॅग, कुठं, कशा विसरतात ते कळत देखील नाही.

     साईबाबांच्या शिर्डीत श्रद्धा-सबुरी बरोबरच या संस्थेत काम करणार्या प्रामाणिक कर्मचार्‍यांवरील भक्तांचा विश्वास सार्थ ठरवत आहेत. मंगळवारी दुपारी गोरेगांव (पारनेर)  येथील नरसाळे परिवार  बाबांचे दर्शन घेतल्यावर प्रसाद घेण्यासाठी साईरथ या बसमध्ये प्रवास करताना सिट खाली पर्स पडली. दोन तास झाले तरी ही गोष्ट भक्ताच्या लक्षात आली नाही. प्रसाद घेऊन येतांना त्याच बसमध्ये परत बसले (एमएच 17 बीवाय 2265) या बसचा चालक रविंद्र पाराजी साळूंके हा कंत्राटी वाहन चालक आधारकार्ड वरील मोबाईल नंबरने संपर्क करीत असतांना त्याच बसमध्ये प्रवास करणार्या अमृता नरसाळे यांना संपर्क झाला व पर्सबद्दल माहिती दिली. पर्समध्ये असलेल्या महत्वाच्या कागदपत्रांवरुन, फोटो, रोख रक्कम, असा ऐवज ओळख पटवून सदर चालक साळूंके यांनी नरसाळे परिवाराला परत दिला.

     याबाबत साळूंके यांचे प्रामाणिक पणाबद्दल आभार मानले.जर संपर्क करता झाला नसता तर तुम्ही काय केले असते असे विचारले असता ते म्हणाले, बाबांच्या दर्शनाला आलेले भक्त आर्शिवाद घेऊन तृप्त होतात. मन भारावून जातात, अशा या आनंदात ते बसमध्ये बॅग, पर्स, काही ना काही वस्तू विसरतात. 4 दिवसांपूर्वी हैद्राबाद येथील एका महिला भक्ताची बॅग विसरली होती त्या मध्ये सोने, रोख रक्कम असा साडेचार ते पाच लाखांचा ऐवज सापडला होता. ओळख पटवून तो परत दिला. मला पाच हजार रुपये रोख बक्षीस देत होत्या. मी ते न घेता बाबांच्या पेटीत टाका ही त्यांची सेवा आहे. मी वाहन चालक म्हणून माझे काम चोख करतो. प्रवासी उतरले की लगेच बस चेक करतो. काही जरी सापडले तर संपर्क साधता आला तर ते परत करतो, नाही संपर्क झाला तर संस्थानच्या ऑफिसमध्ये जमा करतो. अशा या प्रामाणिक कर्मचार्यांवर भक्तांचा विश्वास सार्थ होतो.

     रविंद्र साळूंके यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल 1 मे रोजी संस्थांतर्फे आदर्श वाहन चालक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्य.अधिकारी तुकाराम हुलवळे, सा.बां.उप कार्य.अधिकारी दिनकर देसाई, भिकण दाभाडे, विठ्ठलराव बर्गे, वाहन विभागप्रमुख अतुल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here