पैठण,दिं..२१.(प्रतिनिधी): पैठण एमआयडीसी मधील सेंट पॉल्स इंग्लिश शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले तब्बल २४ वर्षांनंतर विविध क्षेत्रातील मित्र एकमेकांना भेटल्यावर क्षणिक भाऊक झाले होते.
सेंट पॉल्स इंग्लिश शाळेच्या सन. २००० वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात उत्साहात संपन्न झाले यावेळी सन २००० या वर्षाच्या तुकडीचे सर्व माजी विद्यार्थी हे देशातील विविध शहरातून तसेच काही परदेशातून उपस्थिती लावण्यासाठी हजार होते तर काहींना बाहेर देशातून येणे शक्य न झाल्यामुळे त्यांनी त्या परदेशातून व्हिडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून स्नेहसंमेलनात हजेरी लावली यात जितेंद्र राॅय (जर्मनी ), श्रीरंग मरे अमेरिका मधून व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून उपस्थित आपल्या जुन्या मित्रासमवेत जोडले गेले होते.यावेळी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या त्यामुळे सर्वच काही वेळ भावनाविवश झाले होते.येथील स्कूलचे विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रात करत असलेल्या कामाचे अनुभव उपस्थित आपल्या मित्रांना सांगितले. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी सेंट पॉल्स शाळेचे संस्थापक संचालक फादर डॉ व्हलेरिअन फर्नांडिस यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अतिशय कमी वेळेत सर्व मित्रांना संपर्क साधून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलीम इनामदार, किशोर बडजाते , राहुल चन्ने यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला यावेळी कल्याण देशमुख, राहुल पोटे, येशूदास शहाराव, अनिल ढोकणे , श्याम शिंदे, विजयकुमार सोनवणे, किरण सोनवणे, रामेश्वर आगळे, शंतनू कुलकर्णी, प्रणव पाठक, कलीम शेख, संदिप घुले, प्रशांत झिने, निलेश भुसाळ, पायल गोधा, स्वाती गायकवाड, मोनिका कुमारी, संगीता कदम सह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.