कुरवली बुद्रूक : कुरवली बुद्रूक मध्ये भाडेतत्त्वावर गाळे काढण्यात आले असुन , ज्यांना कोणाला आपल्या दुकानासाठी गाळे घेण्यात येतात. ग्रामपंचायत मध्ये डिपाझीट रक्कम भरून आपला गाळा बुक करता येतो . परंतु गाळा विकत घेतल्यावर त्यावर चोरटी लाईट चा वापर केला जातो.
हा गाळा कुरवली पाटी ते शिंगणापूर रस्ता लगत असल्याने खुप मोठ्या प्रमाणात लोकांची ये जा असते ,असे असताना चोरटी लाईट वर आज तागायत कारवाई झाली नाही. ग्रामपंचायत व महावितरण यांची हातमिळवणी आहे का ? अमीर किराणा स्टोअर्स व महावितरण यांची हातमिळवणी आहे ? ऐवढ दिवसा ढवळ्या चोरटी लाईट चा वापर केला जात आहे. तरी याकडे सर्वांचे लक्ष्य लागून असुन यावर कारवाई होणार का अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.