सातारा/अनिल वीर : राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तीसरी ते बारावींचा अभ्यासक्रमात आराखडा जाहीर केला आहे. त्यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला हवा. अशी शिफारस केली गेली आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि या शिफारसीचा पुनश्च विचार करावा.अन्यथा,शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून लवकरच जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे एल्गार आंदोलन छेडण्यात येईल.असाही इशारा देण्यात आला आहे.