पाणी मिळत नसल्याने अधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करा ..होन
कोपरगाव ( वार्ताहर): कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी हे गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यातून मिळते. मात्र गत दहा ते पंधरा वर्षापासून पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे
उन्हाळ्यातच शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त होतात. फळबागा ऊस पिके चारा पिके आदींचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान होते. याला केवळ पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. 15 ते 20 दिवसापासून गोदावरी कालव्यांना पाणी चालू असताना देखील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेले नसल्याने व शेतात पाणी जायच्या आधीच चाऱ्या बंद केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गोदावरी कालवे चालू असताना हे पाणी जाते कुठे असा प्रश्न निर्माण होतो याची सखोल चौकशी शासनाने केली पाहिजे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित केले पाहिजे असे निवेदनाचे पत्रच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकरी सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगीरथ होन यांनी दिले आहे.स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.एकेकाळी या भागाला कॅलिफोर्निया म्हणून संबोधले जायचे मात्र आता या तालुक्याचे पूर्ण वाळवंट झाले आहे. गोदावरी कालव्याच्या ऑफिसवर मागील आठवड्यात शेतकऱ्यांनी आंदोलन केले मात्र तरी देखील
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची दया आली नाही.आपल्याला गोदावरी कालव्यांचे पाणी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली व सात नंबर पाणी अर्ज भरून दिले .कोपरगाव तालुक्याच्या अनेक भागात फळबागांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तर दोन कारखान्याने असल्याने शेतकरी आपल्या शेतात ऊस पिक देखील घेत असतो. मात्र गोदावरी कालव्याच्या डीसाळ नियोजनामुळे चालू वर्षी शेतकऱ्यांची पूर्ण वाहतात झाली आहे.लाखो रुपयाचे नुकसान पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाले असल्याचे
होन यांनी निवेदनाच्या पत्रात म्हटले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे.शेतकऱ्यांचा ज्वलंत असलेला हा पाणी प्रश्न लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी सूचना द्याव्यात व दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी भगीरथ होन यांनी केली आहे.