सातारा/अनिल वीर : युवा ग्रामविकास सामाजीक सेवा संस्थेतर्फे शाहु कला मंदिर येथे बुधवार दि.१२ रोजी सायंकाळी ४ वा.कवी अनंत राऊत यांच्या काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी दंगलकार नितीन चंदनशिवे हे सहकारी कवी आहेत.
यशोधा शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा दशरथ सगरे उद्घाटन करणार आहेत.यावेळी राजमुद्रा ऍकॅडमीच्या संचालिका सौ. संजिता पवार व सरस्वती ऍकॅडमीच्या संचालिका सौ. दीपिका सूर्यवंशी-माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास काव्य रसिकांनी उपस्थीत रहावे. असे आवाहन अध्यक्ष गणेश वाघमारे,विशाल कांबळे आदींनी केले आहे.