शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता 

0

ठाणे प्रतिनिधी; सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामध्ये आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे . लोकसेवकास त्याचे कर्तव्य यापासून परावृत्त करण्यासाठी बल प्रयोग करणे यासारख्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल असलेल्या आरोपी अशोक बाबासाहेब पाटील यांची ठाणे येथील आठव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे यांनी खटला क्रमांक 238 /2019 या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर सदर प्रकरणात गोविंद दगडु साळुंखे यांनी दि.21/11/2016 रोजी वागळे इस्टेट पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय दंड विधान संहिता कलम 353, 352, 504, 506, या कलमान्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक 323/2016 गुन्हा रजिस्टर क्रमांक याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दाखल गुन्ह्यानुसार 21/ 11 /2016 रोजी सकाळी 11 ते 12 च्या सुमारास स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मुंबई या बँकेच्या वतीने शासकीय कामकाजाकरिता कामगार उपायुक्त मुलुंड चेक नाका ठाणे येथे फिर्यादी गोविंद दगडू साळुंखे गेले असता आरोपी अशोक बाबासाहेब पाटील हे त्यांच्या बँकेतील बडोतर्फ कर्मचारी असून त्यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात संबंधित बँकेच्या वतीने हजर राहिल्याचा राग मनात धरून त्यांनी शासकीय कामकाज करू नये या या हेतूने त्यांना मारहाण शिवीगाळ करून दमदाटी केली अशी फिर्याद होती आरोपी विरुद्ध आरोप पत्र दाखल झाल्यानंतर सरकारी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले परंतु आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही.

सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने एडवोकेट बाबासाहेब सर्जेराव बनसोडे यांनी बचाव आणि युक्तिवाद ग्राह्य धरून ठाणे आठवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी अशोक बाबासाहेब पाटील यांची सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केली आहे सदर प्रकरणामध्ये बचाव पक्षाकडून एडवोकेट बाबासाहेब सर्जेराव बनसोडे यांनी चांगली कामगिरी केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सोबतच या प्रकरणात अंकुश गोविंदराव गवळे यांनी याबाबत सहकार्य केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here