सातारा/अनिल वीर : सर्व जिल्हा अध्यक्ष /प्रभारी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणूकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी केलेल्या आवाहनानुसार महाविकास आघाडीला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर बुधवार दि.12 रोजी महत्वपूर्ण चेंबुर या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
“संविधानच्या सन्मानार्थ, संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान बदलणारया प्रवृतींना गाडण्यासाठी तसेच लोकशाही अबाधित राहण्यासाठी महाविकास आघाडीला जाहिर बिनशर्त पाठिंबा दिला होता. आणि आपण सर्वांनी माझ्या ह्या भुमिकेला कसलाही स्वार्थ न ठेवता पाठिंबा देऊन माझ्या आदेशाचे पालन करून तन मन धनाने निष्ठेने अतिशय परिश्रम करून महाविकास आघाडीच्या यशाचे भागीदार झाला आहात. सध्या आपण सत्तेत नाहीत. पण सत्तेच्या जवळ आहोत.उद्याचा येणारा काळ आपल्या सर्वांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा असेल.यामध्ये शंका नाही. आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमाने महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. त्यामुळे सर्वांचे मनापासून अभिनंदन/कौतुक करत आहे. आपण केलेल्या कामाचा मला अभिमान आहे.म्हणून मी आपल्याशी संवाद करण्यासाठी आपले म्हणणे ऐकण्यासाठी दि.12 रोजी.केंद्रीय कार्यालय छेडानगर,चेंबूर येये दुपारी ठिक 12 वाजता सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी पुढील दिशा/वाटचाल ठरवण्यासाठी उपस्थित राहयाचे आहे.” असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ सदाशिव निकाळजे यांनी केले आहे.