आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता !

0

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मोसमी पावसासंदर्भात. खरंतर, सहा तारखेला मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आणि अवघ्या चार ते पाच दिवसात मान्सूनने निम्म्याहून अधिक महाराष्ट्र काबीज केला. विदर्भातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात मौसमी पाऊस दाखल झाला आहे.
कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, खानदेशात आणि विदर्भात आता मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. मोसमी पाऊस विदर्भातील अकोला आणि पुसद पर्यंत पोहोचला आहे. तसेच खांदेशातील जळगाव पर्यंत मोसमी पावसाने मजल मारली आहे. येत्या काही तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार अशी शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच 12 जून 2024 रोजी राज्यातील कोकण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे आज मुंबई सह कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्‍यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या भागातही हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे.
मात्र दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जोरदार पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता असल्याने या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच आज विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात आता मुसळधार मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आता पीक पेरणीला वेग आला आहे. अनेक ठिकाणी खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस पीक पेरणीला सुरुवात झाली असून काही ठिकाणी पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here