सातारा/अनिल वीर : येथील दीपलक्ष्मी पतसंस्था,शाखा- कोडोलीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा गुण गौरव तसेच प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे यां”प्रतापगडावरील ऐतिहासिक लढाई ” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शनिवार दि.१५ रोजी सकाळी १० वा.महापूजा व सायंकाळी ५ वा.व्याख्यान होणार आहे. प्लॉट नंबर ३२,सरस्वती कॉलनी कर्मवीरनगर संभाजीनगर एम.आय.डी.सी.कोडोली येथे सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहेत.यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश माने,उपसरपंच काशिलिंग गोरड, शिवनगर विकास समितीचे व्हाईस चेअरमन सुनील जाधव, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस तसेच व्यवस्थापक विनायक भोसले, शाखाधिकारी आग्नेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दीपलक्ष्मी पतसंस्था समाजामध्ये करत असलेल्या आपल्या आदर्शवत कामाने तसेच सामाजिक बांधिलकीपोटी करत असलेले विविध उपक्रमाने आपल्या कार्याचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. या संस्थेने एकूण ५० कोटी रुपयाच्या ठेवीचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे.शिरीष चिटणीस यांनी सांगितले,”सदर शाखेच्या ८ कोटी १० लाख ठेवी असून ५ कोटीचे ६० लाख कर्ज वाटप केले असून तरल ते पोटी रुपयाची २ कोटी ५० लाख गुंतवणूक शहरातील विविध बँकेत केली आहे. शाखा-कोडोली ही दिवसेंदिवस वृद्धिगंत होत आहे.”;सदरच्या कार्यक्रमास सर्व ठेवीदार, सभासद,कर्जदार व हितचिंतकांनी वेळेवर उपस्थीत रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.