अकलूज : माळशिरस तालुक्यातील अकलूज नगर परिषद हद्दीत जुने एसटी स्टँड ते सदुभाऊ चौक दरम्यान रस्त्याच्या बाजूला गटारीचे काम सुरू आहे. सदरच्या गटारीचा उद्देश रस्त्यावरील व आजूबाजूचे पाणी गटारीतून वाहून जाणे हा आहे. मात्र, गटारीचे असे निकृष्ट काम झालेले आहे की, गटारीतून पाणी वाहून जाण्याऐवजी गटारच पाण्यातून वाहून जाईल. असे दर्जेदार काम ठेकेदाराने केलेले आहे. सदरच्या गटारीची स्थानिक नागरिक व गटारी पाहणाऱ्या जनतेमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे.
जुने एसटी स्टँड ते सदुभाऊ चौक दरम्यान गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. गटारीचे काम नगरपरिषद अकलूज हद्दीमध्ये सुरू आहे. सदरचे काम अकलूज नगर परिषद यांचे आहे ?, का सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे ?, याची कल्पना स्थानिक नागरिक यांना नाही. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने पाण्यासह गटार वाहून जाण्याची शंका स्थानिक नागरिक यांच्यामधून उपस्थित होत आहे.
कोणत्याही विभागाची गटार असू द्या मात्र, अंदाजपत्रक प्रमाणे दर्जेदार गटार होणे गरजेचे आहे, असा स्थानिक नागरिकांचा सूर आहे. सदरच्या गटारीचे काम कोणत्या विभागाकडून सुरू आहे, सदरच्या गटरीचे अंदाजपत्रक किती आहे, ठेकेदार कोण आहे, सदरचे काम कोणत्या अधिकारी यांच्या अधिपत्याखाली आहे, याची सर्व माहिती घेऊन निकृष्ट होणाऱ्या गटारीची चौकशी लावली जाईल, अशी स्थानिक नागरिक यांच्यामधून चर्चा सुरू आहे.