दौड़ रावणगांव, परशुराम निखळे :
शाळेचा पहिलाच दिवस… दीड महिन्याची सुट्टी संपवून शाळेत आलेले विद्यार्थी… काही जण हिरमुसलेले… काहीजण प्रचंड उत्साही… पहिलीच्या विद्यार्थ्यांची मात्र नवीन शाळा, नविन शिक्षक, नवीन मुले यामुळे फार मोठी उत्सुकता ताणलेली…. मनाच्या एका कोपऱ्यात अनामिक भीतीही लपलेली…. अशा वातावरणात आज शाळेचा पहिला दिवस सुरू झाला….शाळेमध्ये पहिलाच दिवस असल्याने शिरा भाताचं गोड जेवण देण्यात आले. श्री प्रल्हाद यादव आणि सामाजिक कार्यकर्ते श्री शरद आप्पा ढवळे या दोघांचा वाढदिवस शाळेमध्ये साजरा करण्यात आला.शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन दोघांचाही सत्कार करण्यात आला.दोन्ही मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे बिस्किटांचे पुढे वाटले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अधिकच द्विगुणीत झाला…
याचवेळी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप तसेच इयत्ता पहिली मध्ये प्रवेश करणाऱ्या नवागतांचा फुगे देऊन ,गंधाचा टिळा लावून स्वागत करण्यात आले. यावेळी खानवटे गावचे सरपंच श्री रंगनाथ ढवळे, माजी सरपंच श्री बबनराव धायतोंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दीपक मामा ढवळे, ग्रामपंचायत सदस्य वैभव लोखंडे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ जयश्री चव्हाण,सदस्य सौ मयूरी यादव, सौ प्रियांका लोखंडे, श्री.मारुती ढवळे,विश्वजित गायकवाड यांच्यासह अमित चांदगुडे, विलास लोखंडे ,चंद्रकांत गाडे, रामदास चव्हाण,गणेश लोखंडे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.सौ.अर्चना भिसे यांनी प्रास्ताविक केले तर रणजीत बनसुडे यांनी आभार मानले. मुख्याध्यापक महादेव बंडगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.