छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) पोलीसांची कारवाई तब्बल ५८.५१लाखाचा गुटखा केला जप्त

0

छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) पोलीसांनी धडाकेबाज कारवाई करत शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुंगधित जर्दा वाहनासह एकुण ५८,५१,३२० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक १४/०६/२०२४ रोजी सतिष वाघ, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. छत्रपती संभाजीनगर,यांना त्यांचे गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, संभाजीनगर शहरातून पुणेच्या दिशेने एक लाल रंगाचा आयशर टेम्पो क्रमांक एमएच – २० जीसी – ०४४६ जात असून या वाहनांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा हा चोरटी विक्री करण्यासाठी घेवून जाणार आहे.

यावरुन पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. सतिष वाघ, यांनी स्थागुशाचे पथक तयार करून छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर रोडवरील भेंडाळा फाटायेथे नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करत असतांना नमूद पथकास २३:४५ वाजेच्या सुमारस सदर टेम्पो मुद्देमालासह पकडण्यात आला. यावरील वाहनाचा चालक शेख वाहेद शेख मुसा वय ३० वर्ष, रा. प्रतापपूर गवळीशिवरा ता. गंगापूर चौकशी केली असता गाडीतील पांढ-या गोण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा असुन या सर्व ८० गोण्यामध्ये सुगंधित तंबाखू व गुटखा भरलेला पान मसाला व तंबाखूच्या ८० गुटख्याचे व सुगंधित तंबाखू किंमती 43,51,320 /- रुपये किमतीचा गुटखा असल्याचे काबुल केले . त्याच सोबत 15,00,000/- रूपये किंमतीचा एक टेम्पो असा एकूण 58,51,320 /- रूपयांचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला .

यावरुन आरोपी नामे शेख वाहेद शेख मुसा वय ३० वर्ष, रा. प्रतापपूर गवळीशिवरा ता. गंगापूर यांने बेकायदेशिर रित्या, चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व तंबाखूच्या ८० गुटख्याचे व सुगंधित तंबाखू बाळगल्या प्रकरणी त्यांचे विरुध्द पोलीस ठाणे गंगापूर येथे गुरनं. ३११ / २०२४ भादंवी कलम ३२८, १८८, २७२, २७३ सह कलम ५९ अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

सदरची कामगिरी वरील अधिकाऱ्यांसह पोउपनि विजय जाधव,पोउपनि दगडू जाधव , पोलीस अंमलदार कासीम शेख, गोपाळ पाटील, राहूल गायकवाड,संतोष डमाळे यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here