पंढरपूर विधानसभेचे मैदान मीच मारणार ; अभिजीत पाटील

0

पंढरपूर : सकाळ वृत्तसेवा आगामी विधानसभा निवडणुकीला तीन महिने अवधी असताना देखील विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी विधानसभेचे दावेदार आणि मैदान मीच मारणार अशी आरोळी ठोकत आपण पंढरपूर विधानसभेची दावेदारी सोडली नसल्याचे सांगितले.
तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत सदस्य सिताराम भगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे बोलत होते.

यावेळी मतदारसंघ अध्यक्ष मुजमिल काझी,माऊली कोडूभैरी,पंडीत माने,दामाजी माने, काशिनाथ सावजी धनाजी चव्हाण आधी उपस्थित होते.यावेळी बोलताना विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले की,विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला मतदान केले नसून बंद पडलेली विठ्ठल कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालावी यासाठी सभासदांनी माझ्या नेतृत्वाखाली पॅनेलला विजयी केले.त्यामुळे कारखान्याची हितासाठी मी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला. यापूर्वीचे अध्यक्ष भारत भालके यांना कारखानदारी चालवताना जे अडचण यायला त्या अडचणीचा अभ्यास करून मी राजकीय वाटचाल करत असताना शिवाजी महाराजांना सुद्धा पुरंदरचा तह करावा लागला त्यानंतर त्यांनी साडेतीनसे किल्ले जिंकले त्याच पद्धतीने आपण आगामी काळात आपली राजकीय वाटचाल चालू असून आपण पंढरपूर मतदार संघात आपले दौरे वाढवून लोकांशी संपर्क ठेवून विधानसभेला सामोरे जाणार आहे.अवकाळीची मदत कर आता करावी यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुढील आठवड्यात भेट घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य भगरे यांचा सत्कार करून अवकाळी नुकसान झालेल्या लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले.


अभिजीत पाटलांची विधानसभेची दावेदारी भाजप की राष्ट्रवादी ?
सध्या अभिजीत पाटीलांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचे समर्थन केले स्वतःच्या गावात देखील भाजपाला मताधिक्य देण्यात यशस्वी ठरल्यामुळे भाजपमधून सुद्धा विधानसभेची दावेदारी मानली जात आहे मात्र या कार्यक्रमात त्यांनी आपण पंढरपूर विधानसभेचे दावेदार असल्याचे सांगताना मात्र पक्ष कोणता यावर भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र वाढदिवसाच्या कार्यक्रमातील सुरू असलेल्या आवाज कुणाचा, आवाज जनतेचा हे राष्ट्रवादीचे गाणी लागताच माझा विधानसभेचा पक्ष आता गाण्यातून स्पष्ट होऊ लागला,मी कशाला जाहीर सांगू अशी मुश्किल टिपणी त्यांनी केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here