पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेस आणि मालगाडीच्या धडकेत १५ जणांचा मृत्यू

0

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकून मोठा अपघात झाला आहे. या अपघातातील मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे, तर 46 जण जखमी झाले आहेत. सोमवारी (17 जून) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

कांचनजंगा एक्सप्रेस आसामच्या गुवाहाटीहून पश्चिम बंगालच्या सियालदहला जात होती. या अपघातामुळं 8 रल्वे रद्द झाल्या आहेत, तर 24 रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

न्यू जलपैगुडीजवळ ही गाडी उभी होती, तेव्हा मालगाडी येऊन धडकली. कांचनजंगा एक्सप्रेसचे तीन डबे अपघातामुळे रुळावरून घसरले.दार्जिलिंगचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिषेक रॉय यांनी माध्यमांना सांगितले की, “कांचनजंगा एक्सप्रेस उभी होती आणि पाठीमागून आलेल्या मालगाडीने टक्कर दिली. त्यामुळे तीन डब्बे पटरीवरुन उतरले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. आम्ही त्यांना बाहेर काढले आहे आणि रुग्णालयात दाखल केले आहे.”

मालगाडी पायलटने सिग्नल तोडला

मालगाडीला धडकल्यानंतर कांचनजंघा एक्सप्रेसचा मागचा भाग पूर्णपणे हवेत लटकत असल्याचं घटनास्थळावरील फोटोंंवरून स्पष्ट होत होतं. रेल्वे बोर्डाचे सीईओ आणि अध्यक्ष जया वर्मा यांच्या मते मालगाडीनं सिग्नल तोडत कांचनजंघा एक्सप्रेसला मागून धडक दिली. या धडकेनं कांचनजंघा एक्सप्रेसच्या मागच्या बाजुला गार्डचा डबा आणि दोन पार्सल व्हॅनचं प्रचंड नुकसान झालं आहे.

अपघातावेळी दोन्ही एक्सप्रेस एकाच पटरीवरून धावत होत्या.

कांचनजंघा एक्सप्रेसमधील सुमारे 1300 सुरक्षित प्रवाशांना त्याच रेल्वेच्या सुरक्षित डब्यांमधून पुढं रवाना करण्यात आलं, असं नॉर्थ फ्रंटियर रेल्वेच्या प्रवक्त्यांनीसांगितलं. या घटनेत मालगाडीच्या ड्रायव्हरसह कांचनजंघा एक्सप्रेसच्या गार्डचाही मृत्यू झाला आहे.

रविवारी सकाळी कांचनजंघा एक्सप्रेस त्रिपुराची राजधानी आगरतळाहून सियालदहकडे रवाना झाली होती.

गुवाहाटी स्टेशन मार्गे ही रेल्वे निघाली होती. सोमवारी सकाळी सुमारे 8 वाजता कांचनजंघा एक्सप्रेस रेल्वेनं पश्चिम बंगालमधील न्यू जलपैगुडी रेलवे स्टेशन ओलांडलं.

त्यावेळी ही रेल्वे जवळपास अर्धातास उशिराने धावत होती. त्यानंतर काही वेळानं सुमारे पाऊणे नऊ वाजता कांचनजंघा एक्सप्रेस रंगापानी-छत्रसाल रेल्वे सेक्शनमध्ये पोहोचली. त्यावेळी मागून येणाऱ्या एका कंटेनर ट्रेननं या रेल्वेला धडक दिली.

या अपघातानंतर कांचनजंघा एक्सप्रेसचा मागचा भाग आणि मालगाडीच्या इंजीनसह त्याचा पुढचा भाग पटरीवरून उतरला.

रेल्वेकडून जया वर्मा यांनी जी माहिती दिली आहे, त्यानुसार मुताबिक़ मालगाडी थांबवण्यासाठी लाल सिग्नल देण्यात आला होता. पण पायलटनं गाडी थांबवली नाही. पुढं जाऊन ती कांचनजंघा एक्सप्रेसला धडकली.

रेल्वे मेन्स फेडरेशनचे महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांनी केलेल्या दाव्यानुसार, मालगाडीचा पायलट सततच्या ड्युटीमुळं प्रचंड थकलेला होता. त्यामुळं त्याला आरामाची गरज होती. पण सोमवारी त्याला पुन्हा ड्युटी देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here