दौड़ रावणगांव, परशुराम निखळे :
आरोग्य सेवांचा सर्व्हे करणे किंवा आरोग्य सेवकांना मदत करण्याचे मुख्य काम असणाऱ्या ऑनलाईन कामाच्या नावाखाली आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांचे अक्षरश: शोषण सुरु आहे. ऑनलाईन काम करायला आपला नकार नाही परंतु त्या अगोदर ऑनलाईन कामासाठी साधने अर्थात मोबाईल व रिचार्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रशासने याची प्रथम दखल घ्यावी . याबाबतचे कोणत्याही विषयचे लेखी सूचना प्रशासन कडून केल्या जात नाही, आशाचे काम नसतानाही त्यांच्यावर हे काम लादले जाते. त्याचा किती मोबदला दिला जाणार आहे , हे काम नक्की कोणाचे काम आहे आणि कोणाकडून करून घेतले जाते ? अशा प्रकारे गट प्रवर्तक व आशा सेविकांचे वरिष्ठांकडून आणि शासकीय यंत्रणांकडून शोषण सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ पुणे यांनी केला आहे .
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यात २८०० आशा स्वयंसेविका, व १५१गट प्रवर्तक कार्यरत आहेत,मागील संपात आशा गट प्रवर्तक यांनी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला होता. परंतु संप काळात आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांनी सांगितले की ऑनलाईन कामावर बहिष्कार घालू नये आपणास ऑनलाईन कामासाठी साधने अर्थत मोबाईल व रिचार्जचे पैसे केंद्र सरकार कडून उपलब्ध करून देण्यात येईल, पण अदयापही आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळलेले दिसत नाही आरोग्यमंत्र्यांनी आशा स्वयंसेविकांना ५हजार रुपये तर गट प्रवर्तक यांना १ हजार मानधन वाढ दिली अजून ती पदरात ही पडली नाही,
गेल्या काही महिन्यांपासून आशा सेविकांचे मानधन प्रलंबित आहे. शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे . सध्या आशा सेविका आणि गट प्रवर्तकांवर सध्या उपासमारीची वेळ आहे. आशासेविकांना ५००० रू मानधन वाढले म्हणजे ५० हजार वाढल्या सारखे प्रशासन ला वाटायला लागले आहे. ५० हजार पगार वाले लोक स्वतःची ही कामे ५ हजार रू च्या मानधन असणाऱ्या व्यक्ती कडून करून घेत असल्याचे सध्या चित्र आहे. ,टीम बेस काम असताना वरिष्ठानी कनिष्ठावर काम ढकलून मोकळेपणाने मिरवण्याचे काम दिसत आहे, किती शोषण, किती अन्याय, गट प्रवर्तक व आशा सेविकांचा प्रशासनाने अंत पाहू नये, जिल्हा व तालुका प्रशासनाने ऑनलाईन कामावर बहिष्कार घालण्याची वेळ आशा सेविकांवर आणू नये वेतन चिट्टी अदयाप ही देण्यात आल्या नाही, गट प्रवर्तक यांच्या मानधन वाढी साठी २ जुलै ला आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, मोठ्या प्रमाणात राज्यतून गट प्रवर्तक सहभागी होणार आहेत.महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघांचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड निलेश दातखिळे यांनी सांगितले आहे.