सातारा/अनिल वीर : जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे प्रचार – प्रसाराचे कार्य आणि त्या अनुषंगाने राबविले जाणारे विविध उपक्रम हे स्तुत्य व प्रेरणादायी आहेत. असे गौरवोद्गार महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे सहसचिव वैभव राजेघाटगे यांनी काढले.
जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने येथील राष्ट्रभाषा भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती सत्कार व गुणगौरव कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बुधचे सुपुत्र वैभव राजघटगे मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले,”जिल्ह्यात आणि राज्यामध्ये मंडळ आणि हिंदी शिक्षक महामंडळाच्या माध्यमातून हिंदी भाषेचे कार्य चांगल्या प्रकारे केले जात आहे. हिंदी विश्वभाषा म्हणून नावारूपाला येत आहे. ती भारताची राष्ट्रभाषा म्हणून प्रतिष्ठापित करण्यामध्ये राज्यातील हिंदी शिक्षकांचे योगदान हे फार महत्वाचे ठरेल. यात तीळमात्र ही शंका असणार नाही.”
सदरच्या कार्यक्रमास बीड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बुध गावचे सुपुत्र दिलीपराव जगदाळे व महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या प्रथम वर्ग अधिकारी अश्विनी रविकांत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख वक्ता म्हणून श्रीधर साळुंखे हे निमंत्रित होते.यावेळी उपाध्यक्ष इकबाल मुल्ला,परीक्षा मंत्री शि.रा. खामकर,भवन सचिव श्रीकांत लावंड, कुमार सोनवलकर, विजय यादव, विकास चव्हाण, नेताजी ननावरे,नेताजी पाटील, नारायण शिंदे, सुनंदा शिवदास आदींची उपस्थिती होती.
हिंदी अध्यापक मंडळाच्या गीत मंचने ईशस्तवन आणि स्वागत गीत प्रस्तुत केले. मंडळाचे अध्यक्ष ता.का.सूर्यवंशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात सूर्यवंशी यानी मंडळ व सहयोगी संस्थाच्या कार्याचा आढावा घेवून कार्यक्रमाचे स्वरूप विशद केले.सत्कारापूर्वी हिंदी शिक्षक महामंडळ निर्मित दहावी हिंदी कृतिपत्रिका संचाच्या पाचव्या आवृत्तीचे ‘महाराष्ट्र हिंदी अध्यापक मित्र’ त्रैमासिक पत्रिका अंकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.यावेळी हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्यात प्रदीर्घ काळ झोकून देवून काम करणारे प्रा.सुधाकर माने,
प्रा.महाळाप्पा शिंदे,प्रा.अंकुश वाठारकर व अरविंद थोरात यांचा सेवापूर्ती प्रीत्यर्थ शाल,श्रीफळ, स्नेहवस्र, पुस्तके व सन्मानपत्र देवून सपत्निक सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात बुधचा सुपुत्र ता.का.सूर्यवंशी यांचा नातू कोलकाताच्या मोहन बग्गान फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व करत असलेला ज्युनियर संघाचा प्रमुख राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अभिषेक सूर्यवंशी याचा व त्याच्या आई वडिलांचा शाल, श्रीफळ,पुस्तके व गौरवचिहन देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करम्यात आला.अभिषेकने आपल्या ‘प्लेयर ऑफ द मॅच’च्या मानधनापैकी दहा हजार रुपये मंडळाला व अभिषेकचे मामा सुनील पोळ यांनी रु.५,०००/- महादेवी वर्मा वाचनालयास देणगी दिली.अभिषेकने आपल्या यशाचे श्रेय आपले मार्गदर्शक,थोरले बंधू अतुल व आईवडिलांना असल्याचे सांगितले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीपराव जगदाळे यांनी आपल्या भाषणात हिंदीचे महत्व प्रतिपादित करून मंडळ हिंदीसाठी करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. प्रा.श्रीधर साळुंखे यांनी अभिषेकचा गुणगौरव करून सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. सन्मानपत्राचे वाचन पतसंस्थेचे चेअरमन हणमंत सूर्यवंशी व कार्यवाह अनंत यादव यांनी केले. उपाध्यक्ष शाहनवाज मुजावर यांनी आभार मानले.राष्ट्रीय गीत वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.उज्वला मोरे व विजयकुमार पिसाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी संजय शिंदे, जुबेर बोरगावकर, राजू सय्यद, गोरख रूपनवर, नवनाथ कदम , चंद्रकांत म्हस्के ,मारुती शिवदास, व्यवस्थापक नवनाथ शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.