सुजय विखेंनी EVM, VVPAT च्या पडताळणीची केली मागणी

0

अहमदनगर : महाराष्ट्रातून अहमदनगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे यांनीही नगरमधल्या 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि VVPATची पडताळणी करण्याची मागणी करणारी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. सुजय विखे यांनी 40 ईव्हीएम मशिन्सच्या पडताळणीची मागणी केली आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा, पारनेर मतदारसंघातील प्रत्येकी 10 आणि नगर, शेवगाव, कर्जत जामखेड, राहुरी येथील मतदान केंद्राच्या प्रत्येकी 5 ईव्हीएम मशिन्सचा समावेश आहे. एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणी करण्यासाठी 40000 रुपये इतका खर्च आहे. त्याचबरोबर त्यावर लागणारा 18 % जीएसटीसुध्दा भरणे उमेदवाराला अनिवार्य आहे.सुजय विखे यांनी 40 केंद्रांवरील पडताळणीसाठी एकूण 18 लाख 88 हजारांचे शुल्क भरले आहे.

अहमदनगर दक्षिण या मतदारसंघातून भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके अशी लढत झाली. यात सुजय विखे पाटील यांना 5,95,868 तर नीलेश लंके यांना 6,24,797 मते मिळाली. निलेश लंके यांनी 28929 फरकाने विजय मिळवला.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत ईव्हीएम मशिन्सद्वारे झालेल्या मतदानाबाबत आणि त्यानंतरच्या मतमोजणीबाबत अनेक आक्षेप घेण्यात येत आहेत.

26 एप्रिलला दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, निवडणूक निकालानंतरही ईव्हीएम आणि VVPAT च्या पडताळणीची प्रक्रीया जर संशयास्पद वाटत असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला फेरतपासणी करण्याची मागणी करता येऊ शकते.

यंदाच्या लोकसभा निवडणूकीत विविध मतदारसंघातून हे आक्षेप नोंदवले जात आहेत. देशभरातील निवडणूक आयोगाला आतापर्यंत ईव्हीएम पडताळणीसाठी 11 अर्ज आले आहेत. त्यातले 8 लोकसभा निवडणूकीतील उमेदवार आहेत तर 3 विधानसभा निवडणूकीतील उमेदवारांचे अर्ज मुख्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here